• Download App
    अमेरिकेतील उद्योगजगताचा भारताला मदतीचा हात, ४० कंपन्यांच्या सीईओंचा टास्क फोर्स|US business community lends a helping hand to India, task force of CEOs of 40 companies

    अमेरिकेतील उद्योगजगताचा भारताला मदतीचा हात, ४० कंपन्यांच्या सीईओंचा टास्क फोर्स

    अमेरिकेतील उद्योग जगताने कोरोनाच्या संकटाशी झुंजत असलेल्या भारताला मदतीचा हात दिला आहे. भारताची मदत करण्यासाठी अमेरिकेच्या ४० कंपन्या सरसावल्या असून, ४० सीईओंच्या टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे.US business community lends a helping hand to India, task force of CEOs of 40 companies


    विशेष प्रतिनिधी 

    नवी दिल्ली: अमेरिकेतील उद्योग जगताने कोरोनाच्या संकटाशी झुंजत असलेल्या भारताला मदतीचा हात दिला आहे. भारताची मदत करण्यासाठी अमेरिकेच्या ४० कंपन्या सरसावल्या असून, ४० सीईओंच्या टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे.

    भारतातील करोना संकटाला थोपवण्यासाठी आता अमेरिकेतील ४० कंपन्यांच्या सीईओने पुढाकार घेतला आहे. या सीईओंनी एका टास्क फोर्सची स्थापना केली आहे. या माध्यमातून भारताला आवश्यक साधनसामुग्रीची मदत केली जाणार आहे.


    अमेरिकेतील स्थलांतरीत भारतीयांची क्रयशक्ती तब्बल १५.५ अब्ज डॉलर


    गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि भारतीय वंशाचे उद्योजक सुंदर पिचाई यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर १३५ कोटींच्या मदतीची घोषणा केली होती. मायकोसॉफ्टचे प्रमुख सत्या नडेला यांनीही मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.

    यूएस चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या यूएस-इंडिया बिझनेस कौन्सिल आणि यूएस इंडिया स्ट्रॅटेजिक अँड पार्टनरशीप फोरमची बैठक सोमवारी झाली. यामध्ये शक्य तितक्या लवकर भारताला ४० हजार ऑक्सिजन मशीन देण्याचा निर्णय घेण्यात आला.

    निवडक उद्योजकांची टास्क फोर्स तयारभारतात कशा प्रकारे मदत करता येईल यासाठी यातील निवडक उद्योजकांची टास्क फोर्ससुद्धा तयार करण्यात आले आहे. यात वैद्यकीय उपकरणे, लस, ऑक्सिजन आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा मदतीच्या स्वरूपात केला जाणार आहे.

    अमेरिकेतील कंपन्यांची भारतात मोठी गुंतवणूक आहे. विशेषत माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांसाठी भारत मोठी बाजारपेठ आहे. सध्या भारताला ऑक्सिजन आणि ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्सची प्रचंड गरज आहे. येत्या काही आठवड्यात २० हजार ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स भारताला पुरवले जातील. तसेच एक हजार ऑक्सिजन मशीन या आठवड्यात भारतात पोहोचतील.

    US business community lends a helping hand to India, task force of CEOs of 40 companies

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या