वृत्तसंस्था
कीव : रशियाविरोधात लढण्यास तयार असल्यास युक्रेनमधील कैद्यांची तुरुंगातून सुटका करण्यात येईल, अशी थेट ऑफरच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी कैद्यांना दिली आहे.रॉयटर्सनं याबाबत वृत्त दिलं आहे. Ukraine Volodymyr Zelensky says Ukraine will release prisoners if willing to join fight against Russiaयुक्रेनच्या तुरुंगात असलेल्या ज्या कैद्यांना लष्करी कारवायांचा अनुभव
आहे, असे कैदी रशियाविरोधात लढण्यास इच्छुक असल्यास त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात येईल, असं झेलेन्स्की यांनी आपल्या निवदेनात म्हटलं आहे. त्याचबरोबर त्यांनी रशियाच्या सैनिकांनीही आवाहन केलं की, “आपला जीव वाचवा आणि युक्रेनमधून माघारी फिरा”
दरम्यान, या लढाईत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी रशियन अण्वस्त्र दलांना हाय अलर्टवर राहण्याचा आदेश दिला आहे. यामुळं पूर्व आणि पश्चिम जगात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. तर दुसरीकडे युक्रेनचे सर्वसामान्य लोकही रशियन सैनिकांविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. दोन दिवसांपूर्वीच रशियन सैनिकांशी लढण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना मैदानात उतरण्याचं आवाहन राष्ट्राध्यक्ष झेलेंन्स्की यांनी केलं होतं.
Ukraine Volodymyr Zelensky says Ukraine will release prisoners if willing to join fight against Russia
महत्त्वाच्या बातम्या
- मंदिरे आमच्या समाजाच्या धारणेची साधने, त्यामुळेच एका मंदिरासाठी उभे राहिले मोठे आंदोलन, सरसंघचालक मोहन भागवत यांचे मत
- घराणेशाही वाद्यांनी फक्त आपल्या तिजोऱ्या भरल्या, पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्लाबोल
- इतिहासातील काही तथ्ये मला लोकांनी सांगितली, मी ती तपासून घेईल, समर्थ रामदास वादाबाबत राज्यपालांनी स्पष्ट केली भूमिका
- छत्रपती संभाजीराजेंचा गौप्यस्फोट, पत्नीने माझ्यावर गनिमी कावा करत स्वत;ही उपोषण केले