वृत्तसंस्था
नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी फोनवरून चर्चा केली. सुमारे 50 मिनिटे झालेल्या या चर्चेत पंतप्रधान मोदी यांनी रशियातून तसेच युक्रेन मधून सेफ मानवी कॉरिडॉर तयार करणे तसेच सुमी विद्यापीठ आणि सुमी शहरातून भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढणे या मुद्द्यांवर भर दिला. या दोन्ही मुद्द्यांवर पुतीन यांनी सहमती दर्शवत भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्याचे आश्वासन दिले.Ukraine Indian Students – modi putin 50 min discussion
– युद्ध थांबविण्याबाबत चर्चा
या खेरीज मोदी आणि पुतीन यांच्या रशिया – युक्रेन युद्ध थांबवण्याबाबत विस्तृत चर्चा झाली. या आधी काहीच वेळापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी युक्रेन चे अध्यक्ष व्लादिमीर झेलींस्की यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती त्यांनी देखील भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्याच्या मुद्द्यावर मोदी यांना आश्वासन दिले आहे एकाच दिवशी रशिया आणि युक्रेन यांच्या राष्ट्राध्यक्षांची मोदी यांनी चर्चा केल्यानंतर जागतिक पातळीवर या दोन्ही देशांचे युद्ध थांबण्याची आशा निर्माण झाली आहे. दोन्ही राष्ट्राध्यक्षांची झालेल्या चर्चेत मोदींनी युद्ध थांबविण्यासंदर्भात विशिष्ट उपाययोजनांची चर्चा केल्याचे देखील सांगण्यात येत आहे.
फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रोन यांनी विनंती केल्यानंतर रशियाने युक्रेनमधील या चार शहरांमध्ये काही तासांसाठी युद्धबंदी जाहीर करून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी वेळ उपलब्ध करून दिला आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतीन यांच्याशी चर्चा करून त्यापुढे जाऊन युद्धावर तोडगा काढण्यास संदर्भात काही व्यावहारिक मुद्द्यांवर देखील चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे.