• Download App
    बांगलादेशात सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याची हिंदू-मुस्लीम आरोपींची कबुली |Two persons trapped in Bangala Desh

    बांगलादेशात सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याची हिंदू-मुस्लीम आरोपींची कबुली

    विशेष प्रतिनिधी

    ढाका – बांगलादेशमधील अल्पसंख्य हिंदूंवर झालेल्या अत्याचारास चिथावणी देणारी पोस्ट सोशल मिडीयावर टाकलेला मुख्य संशयित आणि त्याच्या साथीदाराने गुन्ह्याची कबुली दिली आहे.Two persons trapped in Bangala Desh

    शैकत मंडल हा बांगलादेशी हिंदू मुख्य आरोपी असून रबीउल इस्लाम या मुस्लीम साथीदारासह त्याने जातीय तणाव निर्माण केला.खटल्याआधी झालेल्या सुनावणीत मंडलने कबुली दिल्याचे न्यायालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले.



    १७ ऑक्टोबर रोजी पीरगंज उपविभागातील रंगपूर येथे हिंदूंची घरे पेटविण्यात आली. एका हिंदू व्यक्तीने फेसबुकवर आक्षेपार्ह टाकल्याचे रबीउलनेध्वनिवर्धकावरून जाहीर केले. रबीउल ३६ वर्षांचा असून धर्मगुरू आहे. हिंसाचार आणि लूटमार केल्याचे आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले.

    या दोघांना शुक्रवारी अटक करण्यात आली. रंगपूर येथील वरिष्ठ न्याय दंडाधिकाऱ्यांमोसर त्यांनी गुन्हा कबूल केला.या दोघांच्या चिथावणीनंतर सुमारे ७० हिंदूंची घरे जाळण्यात आली. खटलापूर्व सुनावणीत एकूण सात जणांनी गुन्हा मान्य केला.

    आतापर्यंत ६८३ जणांना अटक करण्यात आली असून ७० तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. २४ हजार संशयितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून यातील बहुतेक अज्ञात आहेत.

    Two persons trapped in Bangala Desh

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Jagannath Rath Yatra : कॅनडात जगन्नाथ रथयात्रेवर अंडी फेकली; भाविकांनी म्हटले- द्वेष श्रद्धेला हरवू शकत नाही; भारत सरकारला कारवाईचे आवाहन

    Trump : ट्रम्प यांची युक्रेनला पॅट्रियट क्षेपणास्त्रे पाठवण्याची घोषणा; म्हणाले- पुतिन दिवसा गोड बोलतात, रात्री बॉम्बस्फोट करतात

    Jaishankar : चीनच्या उपराष्ट्रपतींना भेटले परराष्ट्र मंत्री जयशंकर; म्हणाले- दोन्ही देशांमधील संबंध सुधारत आहेत