विशेष प्रतिनिधी
काबूल – बळाच्या जोरावर सत्ता काबीज केल्यानंतर अफगाण जनतेला माफ केल्याची उदारता दाखविणाऱ्या तालिबानने आता उन्माद सुरु केला आहे. १९९५ मध्ये ज्यांना फाशी दिले त्या नेत्याचा बामियानमधील पुतळा जमीनदोस्त करण्याचे कृत्य तालिबान्यांनी तातडीने केले आहे.Taliban starts misuse of power
याआधी सत्ता ताब्यात असताना तालिबान्यांनी याच परिसरातील बुद्धाच्या भव्य पुतळ्यांची विटंबना केली होती. या काळ्या इतिहासाच्या घातक पुनरावृत्तीचे स्पष्ट संकेतच या कृत्याद्वारे देण्यात आले.मानवी हक्क कार्यकर्ते सलीम जावेद यांच्या एका ट्विटनंतर ही घडामोड व्हायरल झाली.
त्यांनी म्हटले आहे की, …तर तालिबान्यांनी हाजरा नेते अब्दुल अली मजारी यांचा बामियानमधील पुतळा उद्धस्त केलाय. मागील वेळी त्यांना फाशी देण्यात आली होती, बुद्धाचे पुतळे पाडण्यात आले. बहुतेक ऐतिहासिक आणि पुरातन स्मारके पाडण्यात आली. कथित सामुहीक माफीचा हा अतिरेकच म्हणायचा…
दरम्यान, सलीमा मजारी यांना तालिबानने ताब्यात घेतल्याच्या वृत्तास हजारा जमातीच्या सूत्रांनी ट्विटद्वारे दुजोरा दिला. जिल्हा गव्हर्नर पदावर असलेल्या अफगाणिस्तानमधील अल्प महिलांमध्ये त्यांचा समावेश आहे. त्या चाहार्किंत-बल्ख या हजारा जिल्ह्याच्या गव्हर्नर आहेत.
Taliban starts misuse of power
महत्वाच्या बातम्या
- तिहेरी तलाक कायद्यानुसार गुन्हा, सौदी अरेबियातून पत्नीला फोनवरून दिला तलाक
- हिंदूत्वा ची तुलना तालीबान्यांशी, अभिनेत्री स्वरा भास्करवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
- तालीबान्यांच्या विजयाने भारतातही शाब्दिक फटाके, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या प्रवक्त्याने केला सलाम, हिंद मुस्लिमांना वाटतो गर्व
- तालीबानच्या कृत्याचे समर्थन करणाऱ्या खासदारासह दोघांवर देशद्रोहाचा गुन्हा, भारतीय स्वातंत्र्यलढ्याशी केली तुलना