• Download App
    तालीबान्यांच्या कुटुंबांना पाकिस्तान पोहोचतेय, इम्रान मंत्रीमंडळातील मंत्र्यानेच केला गौप्यस्फोट|Taliban families living in Pakistan, says Imran's cabinet minister

    तालीबान्यांच्या कुटुंबांना पाकिस्तान पोहोचतेय, इम्रान मंत्रीमंडळातील मंत्र्यानेच केला गौप्यस्फोट

    विशेष प्रतिनिधी

    इस्लामाबाद: अफगणिस्थानमध्ये दहशतवादी कारवाय करणाºया तालीबान्यांच्या कुटुंबांना पाकिस्तान पोसत असल्याचा गौप्यस्फोट पाकिस्तानच्या एका मंत्र्यानेच केला आहे. त्यामुळे पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालतं तसंच दहशतवाद्यांना प्रोत्साहन देत असल्याची बाब पुन्हा एकदा समोर आली आहे.Taliban families living in Pakistan, says Imran’s cabinet minister

    तालिबानी दहशतवाद्यांची कुटुंबं इस्लामाबादमध्येच राहतात, अशी कबुली पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याच मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने दिली आहे. मंत्री असलेल्या शेख रशिद अहमद यांनी कबुल केले आहे की, अफगाणिस्तानातील तालिबादी दहशतवाद्यांची कुटुंबं पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये राहतात.



    एवढंच नव्हे, तर तालिबानी दहशतवाद्यांवर पाकिस्तानी रुग्णालयांमध्ये उपचारही केले जातात. अफगाणिस्तानध्ये सध्या अमेरिकेचे तैन्य तैनात असून, ते लवकरच मायदेशात परतणार असल्याचे वृत्त आहे. तालिबान्यांच्या हल्ल्यांमुळे अफगाणिस्तानातील हिंसाचारात वाढ झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, तालिबानी हिंसाचारासाठी पाकिस्तानची मदत घेत असल्याचा आरोप पाकिस्तानकडून वारंवार फेटाळला जात आहे.

    एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शेख रशिद अहमद यांनी ही बाब स्पष्ट केली आहे. शेख रशिद अहमद यांनी म्हटलं आहे की, तालिबानी दहशतवाद्यांची कुटुंबं रवात, लोई बेर, बारा काहू आणइ तरनोल या भागांमध्ये राहतात. हा भाग प्रसिद्ध आणि उच्चभ्रू समजला जातो.

    , यापूर्वी इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गाझा पट्टीतील हमासच्या दहशतवाद्यांना पाकिस्तान सैन्याकडून प्रशिक्षण दिलं जात असल्याचा दावा पाकिस्तानचे खासदार राजा जफर उल हक यांनी केला होता. खासदार राजा जफर उल हक हे पाकिस्तानचे माजी मुसद्दी अधिकारी होते.

    पाकिस्तानी सैन्याकडून फार आधीपासून हमास गटाला प्रशिक्षण दिलं जात आहे. पाकिस्तान सैन्याचे स्पेशल कमांडो युनिट एसएसजीचे एक बटालियन याआधीपासून प्रशिक्षण केंद्र चालवण्यासाठी गाझामध्ये असल्याचा दावाही त्यांनी केला होता.

    Taliban families living in Pakistan, says Imran’s cabinet minister

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या