• Download App
    पाकिस्तानात एकाच वेळी 60 हिंदूंचे धर्मांतरण, बळजबरी केल्याचा संशय|simultaneous conversion of 60 Hindus in Pakistan

    पाकिस्तानात एकाच वेळी 60 हिंदूंचे धर्मांतरण, बळजबरी केल्याचा संशय

    विशेष प्रतिनिधी

    कराची : पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात बळजबरीने धर्मांतरण केले जात आहे. सिंध प्रांतातील मीरपूर आणि मिठी परिसरात असाच प्रकार घडला आहे. येथील 60 हिंदूंचे बळजबरीने धर्मांतरण करण्यात आले. या धर्मांतरणाची चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित झाली आहे. हिंदूंना बसवून मौलवी इस्लामची शपथ देत असून, त्यांचे उतरलेले चेहरे प्रसारित झालेल्या चित्रफितीत दिसत आहेत.simultaneous conversion of 60 Hindus in Pakistan

    पाकिस्तानातील सिंध प्रांतातील मतलीनगर समितीचा अध्यक्ष अब्दुल रऊफ निजामनी याने आपल्या फेसबुकवर ही चित्रफीत टाकली आहे. माझ्या निगराणीत 60 जण मुसलमान झाले. त्यांच्यासाठी आशीर्वाद मागा, असे त्याने ही चित्रफीत प्रसारित केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.



    मोठ्या प्रमाणात बळजबरीने केल्या जाणाऱ्या या धर्मांतरणात सिंधमधील कुख्यात मौलवी मियाँ मिठ्ठू आणि अब्दुल रऊफ निजामनीचा हात असल्याचे सांगितले जात आहे. हिंदू मुलींचे अपहरण करून त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्यासाठी मियाँ मिठ्ठू कुख्यात आहे. यापूर्वी त्याने पाकिस्तानातील गरीब हिंदू मुलींचे धर्मांतरण केले आहे.

    पाकिस्तानातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात आवाज उठवणारे कराची येथील डॉ. राजकुमार वंजारा यांनी या सामूहिक धर्मांतरणावर टीका केली आहे. सर्वांचेच अभिनंदन! चिंता करू नका, पाकिस्तान लवकरच 100 टक्के मुस्लिम देश होणार आहे. आज 60 हिंदूंचे धर्मांतरण करण्यात आले, असे त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

    पाकिस्तानात धर्मांतरणाचा मुद्दा आता सामान्य झाला आहे. धर्मांतरण करणाºयांंविरोधात येथे कोणतीही कठोर कारवाई होत नाही. पाकिस्तानात एकही हिंदू शिल्लक राहणार नाही, तो दिवस दूर नाही, अशी टीका देखील त्यांनी फेसबुक पोस्टवर केली आहे.

    simultaneous conversion of 60 Hindus in Pakistan

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या