वृत्तसंस्था
रियाद : मशिदीबाहेरील भोंग्यावर सौदी अरेबियात बंदी घातली असून अझान, इकमतचा पुकारा (आवाज) मशिदीपुरताच ठेवावा, असा आदेश सरकारने काढला आहे. Saudi Arabia bans Loudspikars outside mosques; Government orders to keep Azan, Ikmat’s voice Limited with in the mosque
अझान, इकमतसाठी इमामांकडून सर्रास लाउडस्पीकर वापरला जातो. पण, त्यांचा आवाज हा मशिदीत ऐकू जाईल एवढाच असावा. मशिदीबाहेर राहणाऱ्या घरांपर्यंत तो आवाज पोचविण्याची काहीही गरज नाही, असे सौदी अरेबिया सरकारने काढलेल्या आदेशात म्हंटले आहे. या आदेशाची पायमल्ली केली तर दंड ठोठावला जाईल ,असा इशाराही दिला आहे.
सौदी अरेबियाच्या सरकारने सोमवारी मशिदीबाहेरील भोंग्याच्या ( लाऊडस्पीकरच्या) वापरावर निर्बंध लादण्याचे परिपत्रक जारी केले आहे. इस्लामिक कार्यमंत्री शेख डॉ. अबुल्लातिफ बिन अब्दुलाझीज अल-शेख यांनी हे परिपत्रक जारी केले आहे. परिपत्रकात ,म्हंटले आहे की, केवळ अझान (प्रार्थनेसाठी हाक) आणि इकमतसाठी (सामुहिक प्रार्थनेसाठी दुसरी हाक) लाऊडस्पीकरचा आवाज कमी करण्याचे आदेश दिले आहेत.
परिपत्रकानुसार, प्रार्थनेदरम्यान लाऊडस्पीकरचा आवाज हा मशिदीच्या आत असलेल्या लोकांना ऐकू जावा एवढाच मर्यादित ठेवावा आणि आवाजाची पातळी लाऊडस्पीकरच्या क्षमतेपेक्षा एक तृतीयांशपेक्षा जास्त नसावी. याचे उल्लंघन करणार्यांना दंड ठोठावला जाईल.
शेख मुहम्मद बिन सालेह अल-उथयमीन आणि सालेह बिन फव्ज़ान अल-फवझान यांनी म्हंटले आहे की, अझान, इकमतसाठी लाऊडस्पीकरवर होणाऱ्या मोठ्या आवाजाचा त्रास हा मशिदीच्या आसपास राहणाऱ्या रूग्ण, वृद्ध व्यक्ती आणि घरातल्या मुलांना अधिक होतो.
याव्यतिरिक्त, मंत्रालयाने स्पष्ट केले की इमाम प्रार्थना करतात. तेव्हा त्यांचा आवाज हा मशिदीच्या आत असणाऱ्या लोकांपुरता हवा आणि तो मशिदीबाहेर असलेल्या घरापर्यंत पोचवण्याची गरज नाही. “ मशिदीबाहेर लावलेल्या लाऊडस्पीकरचा वापर करून मोठ्याने कुराण वाचणे हे एकप्रकारे कुराणाचा अनादर करणे आहे. कुराणातील वचने मोठ्या आवाजात ऐकवली जातात तेव्हा ती सर्वच जण ऐकतात, असे नाही. त्यामुळे कुराणाचा एकप्रकारे अनादर होतो.” असे परिपत्रकात म्हटले आहे.
यापूर्वी सौदी मंत्रालयाने २०१९ मध्ये रमजान महिन्यात मशिदींमध्ये लाउडस्पीकरचा आवाज कमी करण्यास सांगितले होते.