• Download App
    कोरोना हे जैविक शस्त्र, चिनी शास्त्रज्ञांकडून 2015 पासून संशोधन, ऑस्ट्रेलियन माध्यमांच्या दाव्याने जगभरात खळबळ । Report Suggests China Weaponized Coronavirus, Chinese scientists discussed weaponising SARS coronaviruses 5 years before Covid pandemic

    कोरोना हे जैविक शस्त्र, चिनी शास्त्रज्ञांकडून 2015 पासून संशोधन, ऑस्ट्रेलियन माध्यमांच्या दाव्याने जगभरात खळबळ

    China Weaponized Coronavirus : कोरोना व्हायरसला संपूर्ण जगात पसरवण्यासाठी चीनने अनेक वर्षे प्लॅनिंग केली होती, 2015 पासूच चिनी शास्त्रज्ञ सार्स कोविड व्हायरसवर जैविक हत्यार बनवण्यासाठी संशोधन करत होते, असे वृत्त ऑस्ट्रेलियन माध्यमांनी दिले आहे. या दाव्यामुळे जगभरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. दरम्यान, कोरोना व्हायरस (COVID19) नेमका कुठून आला, याची अद्याप पुष्टी झालेली नाही. तथापि, सुरुवातीपासूनच चीनच्या वुहान शहरावर बोट ठेवण्यात येत आहे. अमेरिकेने अनेकदा उघडपणे असा आरोप केला आहे की चीनने जाणूनबुजून जगभरात कोरोना विषाणूचा प्रसार केला आहे. Report Suggests China Weaponized Coronavirus, Chinese scientists discussed weaponising SARS coronaviruses 5 years before Covid pandemic


    वृत्तसंस्था

    बीजिंग : कोरोना व्हायरसला संपूर्ण जगात पसरवण्यासाठी चीनने अनेक वर्षे प्लॅनिंग केली होती, 2015 पासूच चिनी शास्त्रज्ञ सार्स कोविड व्हायरसवर जैविक हत्यार बनवण्यासाठी संशोधन करत होते, असे वृत्त ऑस्ट्रेलियन माध्यमांनी दिले आहे. या दाव्यामुळे जगभरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. दरम्यान, कोरोना व्हायरस (COVID19) नेमका कुठून आला, याची अद्याप पुष्टी झालेली नाही. तथापि, सुरुवातीपासूनच चीनच्या वुहान शहरावर बोट ठेवण्यात येत आहे. अमेरिकेने अनेकदा उघडपणे असा आरोप केला आहे की चीनने जाणूनबुजून जगभरात कोरोना विषाणूचा प्रसार केला आहे.

    ऑस्ट्रेलियन माध्यमांचा खळबळजनक दावा

    आता ऑस्ट्रेलियन मीडियाने एक पाऊल पुढे जात हा दावा केला आहे की, चीन अनेक वर्षांपासून कोरोना विषाणूवर संशोधन करत होता. चीनला कोरोना व्हायरस जैविक शस्त्र म्हणून वापरण्याची इच्छा होती. ‘द वीकेंड ऑस्ट्रेलियन’ने आपल्या एका लेखात चीनविषयी हा धक्कादायक दावा केला आहे. वास्तविक, द वीकंड ऑस्ट्रेलियानं हे आरोप चीनमधील एका रिसर्च पेपरच्या आधारे केले आहेत. या संशोधन पत्रात असे म्हटले आहे की, 2015 पासून चीन सार्स विषाणूच्या मदतीने जैविक शस्त्रे बनविण्याचा प्रयत्न करत होता.

    या चिनी रिसर्च पेपरचे शीर्षक आहे- SARS आणि इतर मानवनिर्मित व्हायरसच्या प्रजातींची जैविक शस्त्रे म्हणून अनैसर्गिक उत्पत्ती. यात दावा करण्यात आला आहे की, तिसरे महायुद्ध हे मोठ्या शस्त्रांनी लढले जाणार नाही, या युद्धात जैविक शस्त्रांचा वापर केला जाईल, जी मोठमोठ्या हत्यारांपेक्षा जास्त विनाशकारी आहेत. ‘द वीकेंड ऑस्ट्रेलियन’चे हे वृत्त news.com.au मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

    चीनचा रिसर्च पेपर म्हणजे पक्का पुरावा

    ऑस्ट्रेलियन स्ट्रॅटेजिक पॉलिसी इन्स्टिट्यूट (एएसपीआय) चे कार्यकारी संचालक पीटर जेनिंग्स यांनी news.com.au शी बोलताना सांगितले की हा शोधनिबंध पक्क्या पुराव्यापेक्षा कमी नाही. यातून चीनचा दुष्ट हेतू स्पष्ट दिसून येतो. हे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण हे स्पष्ट आहे की चिनी वैज्ञानिक कोरोना विषाणूच्या विविध स्ट्रेनच्या लष्करी वापराबद्दल विचार करत होते. याचा प्रसार कसा होऊ शकतो, यावरही ते विचार करत होते. आज जगभरात कोरोना विषाणूचा प्रसार झाला आहे. एकट्या चीनमध्येच याचा सर्वात कमी प्रादुर्भाव झालेला आहे.

    जेव्हाही व्हायरसचा तपास करण्याचा मुद्दा येतो, तेव्हा चीन मागे हटतो, याकडेही या वृत्तात लक्ष वेधण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाचे सायबर सिक्युरिटी एक्स्पर्ट रॉबर्ट पॉटर म्हणाले की, कोरोना विषाणू एखाद्या वटवाघळामुळे मार्केटमध्ये पसरू शकत नाही. ही कहाणी पूर्णपणे चुकीची आहे. चिनी रिसर्च पेपरच्या अध्ययनानंतर ते म्हणाले की, हा रिसर्च पेपर एकदम बरोबर आहे.

    चीनला का नकोय तपास?

    जेनिंग्स असेही म्हणाले की, चीनला कोरोना विषाणूच्या तपासामध्ये बाहेरच्या संस्थांना येऊ देण्यात इंटरेस्ट नाही, हेसुद्धा यावरून स्पष्ट होते. जर खरोखरच या विषाणूचा एखाद्या बाजारातून प्रसार झाला असता तर चीनने तपासात सहकार्य केले असते. चीनच्या वहुानमध्ये कोरोना विषाणूची उत्पत्ती शोधण्यासाठी गेलेल्या जागतिक आरोग्य संघटनेनेही आतापर्यंत कोणताही ठोस अहवाल सादर केला नाही. अनेक पाश्चिमात्य देशांनी कोरोना महामारीवरून डब्ल्यूएचओच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.

    Report Suggests China Weaponized Coronavirus, Chinese scientists discussed weaponising SARS coronaviruses 5 years before Covid pandemic

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य