वृत्तसंस्था
संयुक्त राष्ट्र संघ : जगात कोणत्याही धर्माविरोधात हेट स्पीच नको हे खरे, पण त्याचबरोबर धार्मिक भयाचा प्रपोगंडा निवडकपणे पसरवण्याचा प्रतिबंध असावा. इतकेच नाही तर त्याबाबतीत दुटप्पीपणा देखील नको, अशा स्पष्ट शब्दात भारताने अमेरिका आणि इस्लामी देश यांना उद्देशून ठणकावले आहे.Religiophobia: Religious Fear Propaganda “Selective” and Not Duplicate; India beats US, Islamic countries
हेट स्पीच विरुद्ध मोरक्कोने मांडलेल्या ठरावाबाबत भारताचे प्रतिनिधी मूर्ती टी. एस. तिरुमूर्ति यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, की भारत शतकानुशतके लोकशाहीचा आणि बहुविध संस्कृतींचा घटक राहिला आहे. आश्रयदाता देश राहिला आहे. ज्यू, झोराष्ट्रीयन, तिबेटियन इतकेच नाही तर शेजारील देशांमधील धार्मिक अल्पसंख्यांकांना भारताने कायम आश्रय दिला आहे.
त्यांना समानतेने वागविले आहे. भारतामध्ये लोकशाही आणि धार्मिक उदारमतवाद अंगभूत आहे. त्यासाठी बाहेरच्या देशांनी आम्हाला धार्मिक उदारमतवाद शिकवण्याची गरज नाही. विशेषतः जे देश फक्त एकाच धर्माच्या प्रभावाखाली चालतात आणि कट्टरतावादाला खतपाणी घालतात. सीमेपलिकडून दुसऱ्या देशांमध्ये दहशतवाद माजवतात त्यांनी तर अजिबात शिकवण्याची गरज नाही, अशा परखड शब्दात गुरुमूर्ती यांनी इस्लामी देशांनाही सुनावले आहे.
नुपुर शर्माच्या कथित वक्तव्यावरुन इस्लामी देशांनी, अमेरिकेने भारताविरुद्ध ठराव मंजूर केले, काही पावले उचलल्यानंतर मोरक्को मने हेट स्पीच विरोधात संयुक्त राष्ट्र संघात ठराव आणला होता. या ठरावाबाबत भारताने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
धार्मिक भयाचा प्रपोगंडा फक्त अब्रहामिक धर्मांसाठी लागू असता कामा नये तर नॉन अब्रहामिक धर्म देखील तितकेच महत्त्वाचे आहेत. त्यांना देखील लागू असला पाहिजे, असे तिरूमूर्ती यांनी भारताच्या वतीने ठणकवले.
धार्मिक उन्माद रोखण्याचे काम भारत प्रभावीरित्या करतो. कारण भारतात लोकशाहीवादी घटनात्मक सरकार आणि कायद्याचे राज्य आहे, असा टोलाही तिरुमुर्ति यांनी एकाधिकारशाही आणि राजेशाही असलेल्या इस्लामी देशांना लगावला आहे.
Religiophobia: Religious Fear Propaganda “Selective” and Not Duplicate; India beats US, Islamic countries
महत्वाच्या बातम्या
- विधान परिषद : मतांच्या जुळवाजुळवी आधी कापाकापी!!; देशमुख, मालिकांची मते कापली; रवी राणांविरुद्ध अटक वॉरंट!!
- विधान परिषद निवडणूक : नेत्यांचे तोंडी आरोपांचे जोर; महाविकास आघाडीच्या धास्तीच्या बैठका!!
- उद्धवामनी धास्ती “काका” काय करेल??
- विधान परिषद – राज्यसभा : शिवसेनेच्या नाराजीवर अजितदादांचा तोडगा; मतदानाचा कोटा वाढवण्यावर अंतिम क्षणी मुख्यमंत्र्यांचा निर्णय!!