विशेष प्रतिनिधी
कोलंबो : राजपक्ष बंधूंपैकी सर्वांत लहान असलेल्या बसिल राजपक्ष (वय ७०) यांचा देशाचे अर्थमंत्री म्हणून शपथविधी झाला. यामुळे श्रीलंकेवरील राजपक्ष कुटुंबाची पकड आणखीनच घट्ट झाल्याचे मानले जात आहे.Rajpakashe family virtually rules on sri lanka
राजपक्ष बंधूंपैकी गोटाबया राजपक्ष हे देशाचे अध्यक्ष आहेत, तर महिंदा राजपक्ष हे पंतप्रधान आहेत. सर्वांत मोठे बंधू चमल हे देशाचे कृषिमंत्री आहेत. आजच्या शपथविधीमुळे राजपक्ष कुटुंबातील आता सात जण महत्त्वाच्या पदांवर विराजमान आहेत.
महिंदा यांचे ज्येष्ठ पुत्र नमल हे क्रीडा मंत्री आहेत, तर चमल यांचे पुत्र शशींद्र हे राज्य मंत्री आहेत. राजपक्ष बंधूंचे भाचे असलेले निपुण रणवाका हे देखील मंत्री आहेत. महिंदा राजपक्ष हे देशाचे अध्यक्ष असतानाच्या काळात बासिल हे त्यांचे प्रमुख सल्लागार होते.
आता त्यांच्याकडे देशाची आर्थिक सूत्रे आली आहेत. संसदेचे सदस्यच केवळ मंत्री होऊ शकत असल्याने निवडणूक न लढविलेल्या बसिल यांची निवडून आलेल्या सदस्यांमार्फत संसदेत निवड करण्यात आली.
Rajpakashe family virtually rules on sri lanka
महत्त्वाच्या बातम्या
- काश्मीरमध्ये चोवीस तासात पाच दहशतवादी ठार, राज्यातील सुरक्षा आणखी कडक
- Phone Tapping : नाना पटोलेंच्या आरोपांना अजित पवारांचे समर्थन, म्हणाले- पटोलेंचे आरोप निराधार नाहीत!
- ऑस्ट्रेलियातील रंगीबेंरगी प्रवाळ बेटांचा समावेश धोकादायक यादीत शक्य, सरकारचा मात्र विरोध
- तृणमूळच्या हिंसाचाराने दिशा बदलली; पेट्रोल – डिझेल दरवाढीचा गाड्या जाळून निषेध