• Download App
    ऑस्ट्रेलियातील रंगीबेंरगी प्रवाळ बेटांचा समावेश धोकादायक यादीत शक्य, सरकारचा मात्र विरोध|Aus. Govt. opposes UNESCO

    ऑस्ट्रेलियातील रंगीबेंरगी प्रवाळ बेटांचा समावेश धोकादायक यादीत शक्य, सरकारचा मात्र विरोध

     

    कॅनबेरा – पर्यावरण बदलामुळे दिवसेंदिवस संवेदनशील होत चाललेल्या ऑस्ट्रेलियाच्या प्रवाळ बेटांचा दर्जा घटविण्याची शिफारस संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक वारसा समितीने केली असून या प्रयत्नांना विरोध करणार असल्याचे ऑस्ट्रेलिया सरकारने म्हटले आहे.Aus. Govt. opposes UNESCO

    या प्रवाळ बेटांचा (ग्रेट बॅरियर रिफ) सध्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश आहे. मात्र, आता त्यांचा समावेश धोकादायक जागतिक वारसा स्थळांच्या यादीत करण्याची शिफारस करण्यात आली आहे.



     

    ऑस्ट्रेलियाच्या ईशान्य किनाऱ्यावर रंगीबेरंगी प्रवाळ बेटे आहेत. पर्यावरण बदलामुळे हा बेटांना मोठी हानी पोहोचत असून येथील परिसंस्थाही धोक्यात आली आहे. त्यामुळेच त्यांचे जतन करण्यासाठी ऑस्ट्रेलियावर काही प्रमाणात निर्बंध लादण्याचा वारसा समितीचा विचार आहे.

    ऑस्ट्रेलियाचा मात्र वारसा समितीच्या या शिफारशींना विरोध आहे. प्रवाळ बेटांची काळजी घेण्यास आम्ही समर्थ असल्याचा त्यांचा दावा आहे. धोकादायक जागतिक वारसा स्थळांच्या यादीत सध्या ५३ वारसा स्थळे आहेत.

    समितीची निरीक्षणे चुकीची असून अजूनही प्रवाळ बेटे तितकीच रंगीबेरंगी आहेत, असा दावा ऑस्ट्रेलिया सरकारने केला आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात हे आंतरराष्ट्रीय राजकारण होत असल्याचा आरोपही सरकारने केला आहे.

    Aus. Govt. opposes UNESCO

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Ban Aid and Visas : ब्रिटनमध्ये विरोधकांची मागणी; पाकिस्तानला मदत-व्हिसावर बंदी घालावी, पाकने बाल लैंगिक गुन्हेगाराला परत घेण्यास नकार दिला होता

    US-Iran : अमेरिका-इराण तणावामुळे ब्रेंट क्रूड 90 डॉलरच्या पुढे; एका आठवड्यात 16% वाढ; भारतात महागाईचा धोका

    Donald Trump : इराणने म्हटले- अमेरिकन सैनिकांची वाट पाहत आहोत; खार्गवर ताब्याचा प्रयत्न केला, तर कोणीही जिवंत वाचणार नाही