• Download App
    अमेरिकेत 24 सेलिब्रिटींना भेटले पीएम मोदी, एलन मस्क म्हणाले- त्यांना भारताची काळजी, मी त्यांचा फॅन|PM Modi met 24 celebrities in America, Elon Musk said- He cares about India, I am his fan

    अमेरिकेत 24 सेलिब्रिटींना भेटले पीएम मोदी, एलन मस्क म्हणाले- त्यांना भारताची काळजी, मी त्यांचा फॅन

    वृत्तसंस्था

    न्यूयॉर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास पोहोचले. येथे त्यांनी सुमारे 24 सेलिब्रिटींची भेट घेतली. यामध्ये नोबेल पारितोषिक विजेते, अर्थशास्त्रज्ञ, कलाकार, शास्त्रज्ञ, विद्वान आणि बिझनेसमन यांचा समावेश होता. टेस्लाचे सह-संस्थापक आणि ट्विटरचे मालक एलन मस्कदेखील त्यांना हॉटेल न्यूयॉर्क पॅलेसमध्ये भेटण्यासाठी आले होते.PM Modi met 24 celebrities in America, Elon Musk said- He cares about India, I am his fan

    बैठकीनंतर मस्क म्हणाले- ‘मी मोदीजींचा चाहता आहे. त्यांना खरोखरच भारताची काळजी आहे. देशाच्या हिताचे तेच करायचे आहे. इतर कोणत्याही मोठ्या देशापेक्षा भारतात व्यवसायाला अधिक वाव आहे.” मस्क यांनी सांगितले की, ते वर्षाच्या अखेरीस भारतात टेस्लाच्या कारखान्यासाठी जागा निश्चित करणार आहेत. पंतप्रधान मोदींनी मस्क यांना भारत भेटीचे निमंत्रणही दिले. यावर ते म्हणाले- मी पुढच्या वर्षी भारतात येईन.



    पंतप्रधान मोदींनी 24 उद्योगपती आणि विचारवंत नेत्यांची भेट घेतली

    मस्क यांच्याव्यतिरिक्त पंतप्रधान मोदींनी लेखक आणि शैक्षणिक प्राध्यापक रॉबर्ट थर्मन आणि निबंधकार आणि सांख्यिकीशास्त्रज्ञ प्राध्यापक नसीम निकोलस तालेब यांचीही भेट घेतली. याशिवाय खगोलभौतिकशास्त्रज्ञ आणि लेखक नील डीग्रास टायसन, नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ पॉल रोमर आणि गुंतवणूकदार रे डालिओ यांनीही पंतप्रधान मोदींची भेट घेतली.

    विमानतळावर स्वागताला रेड कार्पेट

    तत्पूर्वी, पंतप्रधान मोदी रात्री 10 वाजता न्यूयॉर्कला पोहोचले. जॉन एफ. केनेडी विमानतळावर रेड कार्पेट अंथरून त्यांचे स्वागत करण्यात आले. अमेरिकेचे मुख्य प्रोटोकॉल अधिकारी रुफस गिफर्ड यांनी पंतप्रधान मोदींचे विमानतळावर स्वागत केले. त्यांच्याशिवाय यूएनमधील भारताच्या राजदूत रुचिरा कंबोज आणि अमेरिकेतील भारताचे राजदूत तरनजीत सिंग संधूही तेथे उपस्थित होते.

    अमेरिकेत पोहोचल्यानंतर लगेचच पंतप्रधान मोदींनी विमानतळावर उपस्थित भारतीय वंशाच्या लोकांची भेट घेतली. आज UNच्या योग दिन कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ते उद्यापासून म्हणजेच 22 जूनपासून अमेरिकेचे स्टेट गेस्ट असतील. अमेरिकेने 9 वर्षांनंतर पहिल्यांदाच त्यांना हा सन्मान दिला आहे.

    PM Modi met 24 celebrities in America, Elon Musk said- He cares about India, I am his fan

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या