• Download App
    पाकिस्तानचा पुन्हा अपेक्षाभंग, FATF कडून दिलासा नाहीच, ना'पाक' कारवायांमुळे ग्रे लिस्टमध्येच राहणार । Pakistan remains in Financial Action Task Force FATF grey list says Pakistan media

    पाकिस्तानचा पुन्हा अपेक्षाभंग, FATF कडून दिलासा नाहीच, ना’पाक’ कारवायांमुळे ग्रे लिस्टमध्येच राहणार

    FATF grey list : मनी लाँड्रिंग आणि दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवणाऱ्या फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (FATF)ने पाकिस्तानला दिलासा दिलेला नाही. पाकिस्तान अजूनही एफएटीएफच्या ग्रे लिस्टमध्येच राहणार आहे. एफएटीएफचे अध्यक्ष मार्कस प्लेअर म्हणाले की, पाकिस्तान सतत देखरेखीखाली राहील. त्याने 27 पैकी 26 असाईनमेंट्स पूर्ण केल्या आहेत. Pakistan remains in Financial Action Task Force FATF grey list says Pakistan media


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : मनी लाँड्रिंग आणि दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवणाऱ्या फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (FATF)ने पाकिस्तानला दिलासा दिलेला नाही. पाकिस्तान अजूनही एफएटीएफच्या ग्रे लिस्टमध्येच राहणार आहे. एफएटीएफचे अध्यक्ष मार्कस प्लेअर म्हणाले की, पाकिस्तान सतत देखरेखीखाली राहील. त्याने 27 पैकी 26 असाईनमेंट्स पूर्ण केल्या आहेत.

    एफएटीएफने म्हटले की, पाकने या मुख्य मुद्द्याकडे अजूनही लक्ष द्यावे. तो म्हणजे हाफिज सईद, मसूद अझहरसारख्या संयुक्त राष्ट्रांकडून लिस्टेड दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करण्यात अपयश. एफएटीएफच्या या गटामध्ये चीन, अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि भारत यांचा समावेश आहे. यानंतर पुढील सहा महिन्यांकरिता पाकिस्तानला पुन्हा एकदा ग्रे लिस्टमध्ये ठेवण्यासाठी एफएटीएफने औपचारिक घोषणा केली आहे.

    महत्त्वाचे म्हणजे जून 2018 मध्ये पाकिस्तानला ग्रे यादीमध्ये टाकण्यात आले होते. यानंतर ऑक्टोबर 2018 आणि फेब्रुवारी 2019 मध्ये झालेल्या एफएटीएफ आढावा बैठकीत पाकिस्तानला काही दिलासा मिळाला नाही. एफएटीएफच्या शिफारशींवर कारवाई करण्यात पाकिस्तान अपयशी ठरला आहे. यासह या काळात दहशतवादी संघटनांना परदेशातून आणि देशांतर्गत आर्थिक मदत मिळत राहिली आहे.

    पाकिस्तान एफएटीएफच्या करड्या यादीमध्ये राहिल्यानंतर आधीपासूनच वाईट परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीवर याचा आणखी परिणाम होईल. या यादीमध्ये असल्याने जागतिक बँक, आयएमएफ आणि युरोपियन युनियनकडून आर्थिक मदत मिळण्यास अडचणी येत आहेत. यासह इतर देशांमधूनही आर्थिक मदत उपलब्ध होणार नाही.

    यापूर्वी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी भारत आपल्या राजकीय हितसंबंधांसाठी एफएटीएफचा वापर करत असल्याचा आरोप केला होता. कुरेशी पुढे म्हणाले की, हे एक टेक्निकल व्यासपीठ आहे, ज्याचा उपयोग राजकीय लाभासाठी होऊ नये.

    Pakistan remains in Financial Action Task Force FATF grey list says Pakistan media

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!