• Download App
    पाकिस्तानात बनला मधुमेहींसाठी आंबा, साखरेचे अत्यल्प प्रमाण, तरुणाचे संशोधन|Pakistan made mango for diabetics, very low sugar, research of Pakistani youth

    पाकिस्तानात बनला मधुमेहींसाठी आंबा, साखरेचे अत्यल्प प्रमाण, तरुणाचे संशोधन

    पाकिस्तानातील एका तरुणाने चक्क मधुमेहींसाठी (डायबेटीस) आंबा बनविला आहे. साखरेचं प्रमाण अत्यल्प असणाऱ्या आंब्याच्या नव्या जातीचे संशोधन केले आहे. साखर कमी असणाऱ्या आंब्याच्या वेगवेगळ्या तीन जाती पाकिस्तानमध्ये विकसित करण्यात आल्या आहेत.Pakistan made mango for diabetics, very low sugar, research of Pakistani youth


    विशेष प्रतिनिधी

    कराची : पाकिस्तानातील एका तरुणाने चक्क मधुमेहींसाठी (डायबेटीस) आंबा बनविला आहे. साखरेचं प्रमाण अत्यल्प असणाऱ्या आंब्याच्या नव्या जातीचे संशोधन केले आहे.साखर कमी असणाऱ्या आंब्याच्या वेगवेगळ्या तीन जाती पाकिस्तानमध्ये विकसित करण्यात आल्या आहेत.

    सोनारो , केट आणि ग्लेन अशी या तीन जातींची नावं आहेत. यामध्ये केवळ 4 ते 6 टक्के एवढंच साखरेचं प्रमाण असतं. त्यामुळं मधुमेहींना हे आंबे खाणे शक्य होणार आहे. सिंध प्रांतात असणाऱ्या एम. एच. पन्हवर फार्ममध्ये या आंब्याच्या जातींवर यशस्वी संशोधन करण्यात आलं आहे. गुलाम सरवार या तरूणाने हे संशोधन केले आहे.



    एम. एच. पन्हवर यांना पाकिस्तान सरकारनं आंबा आणि केळी या पिकांवरील संशोधनासाठी सितारा-ए-इम्तियाज हा किताब देऊन सन्मानित केले होते. आपल्या काकांच्या संशोधनाचा हाच वारसा आपण पुढं नेल्याची प्रतिक्रिया गुलाम सरवार याने दिली.

    वेगवेगळ्या देशातील आंब्याच्या प्रजाती आणून त्या पाकिस्तानमधील जमिनीत उगवताना काय ट्रेंड दाखवतात, यावर संशोधन करता करता या शुगर फ्री आंब्यापर्यंत आपण पोहोचलो, असं गुलामनं म्हटलंय.
    गुलामनं आंबा पिकाची काढणी केल्यानंतर त्याचं आयुष्य वाढवणं, आंब्यातील साखरेचं प्रमाण कमी करणं आणि नव्या संशोधित आंब्याचं अधिकाधिक उत्पादन घेणं या त्रिसुत्रीवर काम केलं.

    संशोधन केलेल्या केट या आंब्याच्या प्रकारात सर्वात कमी म्हणजे 4.7 टक्के साखर आहे. सोनारोमध्ये 5.6 टक्के तर ग्लेनमध्ये 6 टक्के साखरेचं प्रमाण असल्याचं सिद्ध झालं आहे. पाकिस्तानमधील विविध बाजारपेठांमध्ये हे आंबे सध्या विक्रीसाठी उपलब्ध असून त्यांची किंमत 150 रुपये किलो आहे.

    Pakistan made mango for diabetics, very low sugar, research of Pakistani youth

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या