Monday, 12 May 2025
  • Download App
    अत्याधुनिक जागतिक शहरे न्यूजर्सी, न्यूयॉर्क पाण्याखाली, मुसळधार पावसाने अमेरिका हादरली New York and newjersy collapsed due to rain and flood

    अत्याधुनिक जागतिक शहरे न्यूजर्सी, न्यूयॉर्क पाण्याखाली, मुसळधार पावसाने अमेरिका हादरली

    विशेष प्रतिनिधी

    न्यूयॉर्क – इडा चक्रीवादळामुळे अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहर आणि न्यू जर्सी येथे मुसळधार पाऊस झाला असून निम्मे शहर पाण्य़ाखाली गेले आहे. त्यामुळे किमान ४५ हून अधिक जणांचे बळी गेले आहेत. न्यूयॉर्क शहरात विक्रमी पाऊस पडत असून महापूर आला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचल्याने नागरिक बिकट स्थितीचा सामना करत आहोत. New York and newjersy collapsed due to rain and flood

    न्यूयॉर्क शहर आणि प्रांताच्या अन्य भागात इडा चक्रीवादळामुळे आणीबाणी घोषित करण्यात आली. सब वे स्थानक आणि रुळावर पाणी साचल्याने मेट्रोपॉलिटन ट्रान्स्पोर्टेशन ॲथोरिटीने सर्व सेवा स्थगित केल्या. सोशल मीडियावर शहरात शिरलेल्या पाण्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

    यात शहरातील प्रमुख मार्गावर उभ्या असलेल्या गाड्या खिडक्यापर्यंत बुडल्याचे दिसते. रस्त्याला तलावाचे रूप धारण केले आहे. मुसळधार पाऊस आणि पूर असताना न्यूजर्सीच्या ग्लूसेस्टर कौंटीत कौंटीला चक्रीवादळाचे संकट आहे.या भागातील शेकडो घरांची हानी झाली आहे. चोहोबाजूला पाणी साचले असून मेट्रो स्थानकातून झरे वाहत आहेत.

    New York and newjersy collapsed due to rain and flood

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Russian President Putin : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची युक्रेनला चर्चेची ऑफर; युरोपीय देशांच्या धमकीनंतर आला प्रस्ताव

    Shahbaz : PAK पंतप्रधानाचा खोटारडेपणा; शाहबाज म्हणाले- भारताकडून आधी युद्धबंदीचे उल्लंघन; रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढणार

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!