• Download App
    तालिबानने विमाने रोखल्याने शेकडो जण अफगणिस्तानाच पडले अडकून, तालिबानकडून ब्लॅकमेलिंग सुरु Lot of peoples stayed in afghan wants to fly

    तालिबानने विमाने रोखल्याने शेकडो जण अफगणिस्तानाच पडले अडकून, तालिबानकडून ब्लॅकमेलिंग सुरु

    विशेष प्रतिनिधी

    काबूल – तालिबानी राजवटीपासून सुटका मिळविण्यासाठी देश सोडून जाऊ इच्छिणारे शेकडो लोक अद्यापही अफगाणिस्तानात अडकून पडले आहेत. यामध्ये अनेक अमेरिकी नागरिकांचा समावेश असून त्यांना नेण्यासाठी आलेली चार खासगी विमाने मझार ए शरीफ येथील विमानतळावरच उभी आहेत. त्यांना तालिबानने अद्याप उड्डाणाची परवानगी दिलेली नाही. Lot of peoples stayed in afghan wants to fly

    या सर्वांना अफगाणिस्तानच्या बाहेर जाऊ देण्याच्या बदल्यात अमेरिकेकडून अनेक मागण्या मंजूर करवून घेण्याचा तालिबानचा डाव असल्याची शंकाही समितीने व्यक्त केली आहे.



    ‘आमचे लोक विमानात बसलेले आहेत, मात्र विमान उड्डाणास परवानगीच मिळत नाही. याचाच दुसरा अर्थ म्हणजे, अमेरिकेच्या लोकांना तालिबानने ओलिस ठेवले आहे,’ असा आरोप अमेरिकी संसदेच्या परराष्ट्र व्यवहार समितीने केला आहे.

    अडकून पडलेल्या नागरिकांपैकी काही जण अमेरिकेचे असले तरी बहुतांशी लोक अफगाणीच असल्याचे मझार ए शरीफ विमानतळाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. या अफगाणी लोकांकडे पासपोर्ट आणि व्हिसा नसल्याचाही दावा या अधिकाऱ्याने केला. मात्र, या लोकांची सुटका करण्यासाठी अमेरिकेवर दबाव वाढत आहे.

    Lot of peoples stayed in afghan wants to fly

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या