• Download App
    पंतप्रधान नरेंद्र मोदींचे इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनने केले कौतुक | Kevin Peterson applauds PM Modi as a 'Hero' for his rhino conservation efforts

    पंतप्रधान नरेंद्र मोदींचे इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनने केले कौतुक

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘हिरो’ असे संबोधून माजी कर्णधार केविन पीटरसने पंतप्रधान मोदी यांची प्रशंसा केली आहे. केविन पीटरसनने ट्विटरवरील एका ट्विटमध्ये ही प्रतिक्रिया दिली आहे.

    Kevin Peterson applauds PM Modi as a ‘Hero’ for his rhino conservation efforts

    आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिसवा शर्मा यांनी जागतिक गेंडा दिवस एकशिंगी गेंड्यांची जप्त केलेली एकूण २४७९ शिंगे जाळून टाकून साजरा केला. त्यांनी ट्विटमधे आसाम  आणि भारतासाठी या दिवसाला ‘ऐतिहासिक दिवस’ म्हणून संबोधले आहे. आम्ही एक निर्णय घेत एकशिंगी गेंड्यांची तब्बल २४७९ शिंग जाळण्याचे ठरविले आहे. जागतिक पातळीवर शिंगे जाळण्याची अशी ही पहिलीच घटना आहे”. ट्विटरवरील एका ट्विटमध्ये मुख्यमंत्री म्हणतात की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आसाम मधील एकशिंगी गेंड्यांच्या शिकारी बंद करण्यासाठीच्या व्हिजननुसार आम्ही काम करत आहोत.


    PM Modi In US : सात वर्षे, 7 दौरे…ओबामा, ट्रम्पनंतर आता बायडेन यांची भेट, असा आहे मोदींचा मैत्रीचा प्रवास


    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ट्विटवर प्रतिक्रिया म्हणून एक ट्विट केले आहे. त्यात ते म्हणतात , “टिम आसामने चांगली कामगिरी केली आहे. एकशिंगी गेंडा हा भारताचा अभिमान आहे. एकशिंगी गेंड्यांच्या सुरक्षिततेसाठी जे काही करता येईल ते करणार आहोत.” पंतप्रधान मोदी यांच्या ट्विटवर वन्यजीवसंवर्धक पण असलेल्या कर्णधार केविन पीटरसनने प्रतिक्रिया दिली. या ट्विटमध्ये त्याने लिहिले आहे की, “नरेंद्र मोदीजी तुमचे खूप खूप आभार! एक जागतिक नेता गेंड्यांसाठी काम करत आहे, याचा आदर्श अनेक नेत्यांनी घ्यावा.” भारतातील गेंड्यांची संख्या त्यांच्यामुळे चांगल्या प्रकारे वाढत आहे.  “ते हिरो आहेत”.

    Kevin Peterson applauds PM Modi as a ‘Hero’ for his rhino conservation efforts

     

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या