वृत्तसंस्था
कोलंबो : हंबनटोटा बंदराचा चीनला लष्करी वापर करू न देण्याचा निर्णय श्रीलंकेने घेतला आहे. चीनचे हेरगिरी जहाज हंबनटोटा बंदरात पोहोचल्यावर भारताने चिंता व्यक्त केली होती. यानंतर श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांनी चीनला या बंदराचा लष्करी हेतूने वापर करू देणार नसल्याचे सांगितले आहे.India tough on Chinese ship Sri Lanka’s explanation- Military use not allowed
चीनच्या दबावाखाली श्रीलंकेने गेल्या आठवड्यात चीनी गुप्तचर जहाज युआन वांग 5 ला हंबनटोटाला भेट देण्याची परवानगी दिली. चीनचे जहाज गेल्या अनेक दिवसांपासून सागरी सफरीवर होते, त्यावर भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांनी चिंता व्यक्त केली होती. उपग्रह आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मागोवा घेण्यासाठी चीनच्या या हेरगिरी जहाजाचा वापर चिनी लष्कर करते.
- श्रीलंकेचे पंतप्रधान रानील विक्रमसिंघे यांचा राजीनामा; सर्वपक्षीय सरकार बनवण्याचे आवाहन आणि आव्हान!!
“हंबनटोटाचा वापर लष्करी उद्देशांसाठी होऊ नये असे आम्हाला वाटते,” असे श्रीलंकेच्या अध्यक्षांनी एका जपानी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. ते म्हणाले, “सध्याचे जहाज लष्कराच्या श्रेणीत येत नाही. [ते] संशोधन जहाजाच्या श्रेणीत येते. म्हणूनच जहाजाला हंबनटोटा येथे येण्याची परवानगी दिली.
चिनी गुप्तहेर जहाजावर भारत कठोर
या महिन्याच्या सुरुवातीला भारताने चीनच्या या हेरगिरी जहाजाबाबत कडक संदेश दिला होता. भारतीय उच्चायुक्तालयाने कोलंबोतील श्रीलंकेच्या अधिकार्यांकडे हा मुद्दा उचलून धरला होता आणि कठोर भूमिका घेऊन याबाबत चिंता व्यक्त केली होती. तर भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनीही श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री अली साबरी यांच्यासह आसियान परिषदेत हा मुद्दा उपस्थित केला होता.
भारताने श्रीलंकेला 3.8 अब्ज डॉलरची मदत दिली
श्रीलंका सध्या सर्वात वाईट आर्थिक संकटाचा सामना करत आहे आणि देशात अन्न आणि इंधनाची तीव्र टंचाई आहे. अशा परिस्थितीत श्रीलंका सरकारने भारत आणि खुद्द चीनकडे मदतीचा हात पुढे केला आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी भारताने श्रीलंकेला 3.8 अब्ज डॉलर्सचे कर्ज दिले आहे आणि कर्जाची परतफेड करण्यास विलंब केला आहे. तर चीनने आतापर्यंत 76 दशलक्ष डॉलर्सचे आपत्कालीन अनुदान दिले आहे.
India tough on Chinese ship Sri Lanka’s explanation- Military use not allowed
महत्वाच्या बातम्या
- ITBP जवानांची बस दरीत कोसळून 7 ठार, 41 जण होते स्वार; अमरनाथ यात्रेच्या ड्यूटीवरून परतताना दुर्घटना
- अमूल आणि मदर डेअरीचे दूध 2 रुपयांनी महागले : नवे दर लागू, मार्चपासून दर प्रति लिटर 4 रुपयांची वाढ
- 17 ऑगस्ट 2022 : आज सकाळी बरोबर 11.00 वाजता संपूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रगीत समूह गायन!! विश्वविक्रमाची संधी!!
- सुप्रीम कोर्टात याचिका : ट्रिपल तलाकनंतर मुस्लिम महिलांचा तलाक ए हसनला विरोध!!