वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारतात रशियाची स्पुटनिक व्ही (Sputnik V) लस दिली जाणार आहे. या लसीची पहिली तुकडी भारतात 1 मे रोजी मिळणार आहे. रशिया डायरेक्ट इनवेस्टमेंट फंडचे (RDIF) प्रमुख किरील दिमित्रिक यांनी ही माहिती दिली. India to receive first batch of Russia’s covid 19 Vaccine Sputnik V on May 1
किरील दिमित्रिक म्हणाले की, पहिला डोस 1 मे रोजी भारतात येईल. या लसींमुळे भारतातील कोरोनावर मात करण्यास मदत मिळेल. दरम्यान, आरडीआयएफने 5 मोठ्या भारतीय औषध उत्पादक कंपन्यांसोबत वर्षाला 85 कोटींपेक्षा जास्त लसीचे डोस तयार करण्याचा करार केला आहे. त्यामुळे लसीचे उत्पादन भारतात सुरू होणार आहे. दरमहा 5 कोटी डोसचे उत्पादन करण्यात येईल.
स्पुटनिक व्ही कोरोनावरील तिसरी लस असणार आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या लसींना परवानगी दिली. दरम्यान, सध्या या लसींचे कोट्यवधी लोकांना डोस दिले आहेत.
India to receive first batch of Russia’s covid 19 Vaccine Sputnik V on May 1
महत्वाच्या बातम्या
- सुवर्णसंधी : बंपर भरती स्टेट बँक ऑफ इंडियात तब्बल 5237 जागा ; वाचा सविस्तर
- Free vaccination : भारत सरकारकडून १८ वर्षावरील प्रत्येकाला लस मोफतच फडणवीस
- ‘राज्याला रेमडेसिवीर पुरविणारयाचा छळ होऊ नये, यासाठीच पोलिस स्थानकात गेलो..’, रिबेरोंच्या लेखाला उत्तर देताना फडणवीसांनी उघड केला त्या रात्रीतील घडामोडींचा घटनाक्रम
- आमने-सामने : आदित्य-मलिक-थोरात यांच्यात श्रेयाची स्पर्धा ; कोरोनाने होरपळणाऱ्या महाराष्ट्रात मोफत लसीकरणावरून आघाडीत ‘विस्फोट’ ; आदित्यचे ट्विट-डिलीट
- अडीच लाख उत्तर भारतीयांचा पुण्याला बायबाय, रेल्वेने रवाना; कोरोना, लॉकडाऊनचा परिणाम