भारतीय लसींची निर्यात बंद केल्यामुळे जगभरातील ९१ देशांवर कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हे गरीब देश कोविशिल्ड या लसीवर अवलंबून होते. याची भारतात निर्मिती अदर पूनावाला यांची सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया करत आहे. तसंच कोरोना प्रतिबंधात्मक नोवावॅरक्सच्याही हे देश प्रतीक्षेत असल्याचे भीती जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी सांगितले.India suspends vaccine exports, threatens new corona strain in 91 countries, WHO fears
विशेष प्रतिनिधी
जिनीव्हा : भारतीय लसींची निर्यात बंद केल्यामुळे जगभरातील ९१ देशांवर कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हे गरीब देश कोविशिल्ड या लसीवर अवलंबून होते.
याची भारतात निर्मिती अदर पूनावाला यांची सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया करत आहे. तसंच कोरोना प्रतिबंधात्मक नोवावॅरक्सच्याही हे देश प्रतीक्षेत असल्याचे भीती जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी सांगितले.
डॉ. सौम्यनाथन म्हणाल्या, भारतात सर्वप्रथम कोरोनाचा इ.1.617.2 व्हेरिअंट सापडला होता. करोना प्रतिबंधात्मक लसींचा पुरवठा होत नसल्यानं आफ्रिकी देशांवर या व्हेरिअंटचा धोका वाढला आहे.
अन्य गरीब देशांनाही लसीचा पुरवठा न होण्याची शक्यता आहे. या देशांमध्ये इ.1.617.2 व्हेरिअंट तेजीने पसरत आहे. याची ओळख पटण्यापूर्वीच हा विषाणू तेजीनं पसरतो. विषाणूच्या ११७ व्हेरिअंटमध्ये असे दिसून आले आहे.जर लसींचा असाच असमान पुरवठा सुरू राहिला तर काही देशांमध्ये याचा मोठा फटका बसू शकेल.
येणाºया लाटा गरीब देशांसमोर मोठं संकट निर्माण करू शकतात. परंतु भारताला कोणीही सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेककडून मोठ्या प्रमाणात लस खरेदीसाठी कोणीही थाबवू शकत नाही, असेही डॉ. सौम्यनाथन यांनी स्पष्ट केले.
India suspends vaccine exports, threatens new corona strain in 91 countries, WHO fears
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रात पत्रकारांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा मिळेना, केंद्राकडून आणि उत्तर प्रदेशात पत्रकारांना आर्थिक मदत देणे सुरूही
- नवीन पटनाईक यांनी ओडिशाची ओळख बदलली, सर्वाधिक गरीब राज्य ते संकटाशी यशस्वी मुकाबला, आता आपत्तीशी लढण्यासाठी घर घर योध्दा
- लॉकडाऊन सदृश्य निर्बंध पुन्हा वाढविले; मात्र पॉझिटिव्हिटी दर कमी असल्यास दुकानांच्या वेळा दुपारी दोनपर्यंत
- केंद्र सरकार जुलैअखेरपर्यंत २० ते २५ कोटी कोविड प्रतिबंधक लसीचे डोस मिळविणार; दरमहा संख्येत वाढही करणार
- कोविडच्या तिसऱ्या लाटेलाही तोंड देण्यास देश सज्ज; सार्वत्रिक लसीकरणाची योजना वास्तवात आणू; विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाचा निर्वाळा