• Download App
    इस्त्राएल-पॅलेस्टिींमधील संघर्ष थांबावा, भारताची संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत भूमिका|India-Palestine conflict should end, India's role in UN Security Council

    गाझापट्टीतून इस्त्राएलवर होत असलेले रॉकेट हल्ले निषेधार्ह… भारताची राष्ट्रसंघात भूमिका

    इस्त्राएल आणि पॅलेस्टिीनमध्ये सुरू असलेला संघर्ष त्वरीत थांबावा अशी भूमिका भारताने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडली आहे.


    विशेष प्रतिनिधी

    वॉशिंग्टन : इस्त्राएल आणि पॅलेस्टिीनमध्ये सुरू असलेला संघर्ष त्वरीत थांबावा अशी भूमिका भारताने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडली आहे.
    संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेची व्हर्च्यूअल बैठक रविवारी झाली.India-Palestine conflict should end, India’s role in UN Security Council

    यावेळी भारताचे संयुक्त राष्ट्रसंघातील कायमचे प्रतिनिधी आणि राजदूत टी. एस. त्रिमूर्ती म्हणाले, आताच्या परिस्थितीत संघर्ष थांबणे अत्यंत आवश्यक आहे. दोन्ही बाजुंनी कोणत्याही प्रकारची कृति करू नये. त्याचबरोबर जैसे थे परिस्थिीती ठेवण्यासाठी प्रयत्न करावा.



    गाझापट्टीतून इस्त्राएलच्या नागरी भागात होत असलेला रॉकेटचा मारा निषेधार्ह आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्त्राएलकडून गाझापट्टीवर होत असलेल्या हल्यांमुळे अनेक प्राण गेले आहेत. भारताने आपला एक नागरिक त्यामध्ये गमावला आहे.

    सध्या इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात सुरू असलेल्या वाद चिघळत चालला आहे. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या या संघषार्ला इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमास जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.

    जोपर्यंत आवश्यक असेल तोपर्यंत गाझामध्ये हल्ले सुरूच राहतील आणि लोकांना कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये यासाठी इस्रायल पूर्ण प्रयत्न करेल, असे त्यांनी सांगितले.या संघषार्साठी जे जबाबदार आहे तो इस्रायल नाही.

    यासाठी ते जबाबदार आहेत ज्यांनी आमच्यावर हल्ला केला. आम्ही कारवाईच्या मध्यात आहोत. कारवाई अद्याप संपली नाही. जोपर्यंत गरज असेल तोवर ही कारवाई सुरूच राहिल, असे ते म्हणाले.

    आम्ही सामान्य लोकांना कोणतंही नुकसान होणार नाही यासाठी प्रयत्न करतोय. आम्ही दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर निशाणा साधत आहोत.इस्रायलच्या सैन्याने गाझा शहरातील काही बिल्डिंग खाली करण्याचा इशारा दिला होता.

    याच परिसरात असोसिएट प्रेस आणि इतर मीडियाच्या बिल्डिंग आहेत. त्यानंतर तासाभरात याठिकाणी इस्रायलने एअर स्ट्राईक केला. या हल्ल्यात १२ मोठ्या इमारती उद्ध्वस्त झाल्या.

    India-Palestine conflict should end, India’s role in UN Security Council

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या

    Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प इटलीच्या PM मेलोनींना भेटले; युरोपियन युनियनशी व्यापार कराराचे आश्वासन