• Download App
    नोकरीमध्ये पगार वाढ मागणे मला चुकीचे वाटते, इंद्रा नुयी यांच्या ह्या विधानामुळे त्या होताहेत ट्विटरवर ट्रोल, समान वेतनाचा मुद्दा पुन्हा जोर धरतोय | 'I never asked rise in salary' says Indra Nooyi, issue of equal pay has bubbled up again on Twitter, Indra nooyi got trolled

    नोकरीमध्ये पगार वाढ मागणे मला चुकीचे वाटते, इंद्रा नुयी यांच्या ह्या विधानामुळे त्या होताहेत ट्विटरवर ट्रोल, समान वेतनाचा मुद्दा पुन्हा जोर धरतोय

    विशेष प्रतिनिधी

    न्यूयॉर्क : नुकताच इंद्रा नुयी यांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. या पुस्तकात त्यांनी आपले बालपण, आपले करिअर विषयीच्या बऱ्याच आठवणी सांगितल्या आहेत. पेप्सीको कंपनीच्या माजी सीइओ इंद्रा नुयी यांना जगातील सर्वात प्रभावशाली महिला म्हणून पाहिले जाते. अलीकडेच न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी एक स्टेटमेंट केले आहे ज्यावर बऱ्याच लोकांनी आक्षेप घेतला आहे.

    ‘I never asked rise in salary’ says Indra Nooyi, issue of equal pay has bubbled up again on Twitter, Indra nooyi got trolled

    मुलाखती मध्ये त्या म्हणाल्या होत्या की, ‘मी कधीही पगारामध्ये वाढ मागितली नाही. कारण आपण कोणासाठी तरी काम करतोय आणि त्यांच्या कडून तुम्ही पगारामध्ये वाढ मागता हे मला बरोबर वाटत नाही. मला त्याची गरजही वाटली नाही. माझे आणि माझे पती यांचे जेव्हा ह्या विषयावर बोलणे व्हायचे, तेव्हा आमच्या दोघांचे असे मत व्हायचे की, आपण अपेक्षाही केली नव्हती त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला मिळत आहे, तर आपण कशासाठी पगारामध्ये वाढ अपेक्षित करायची.’

    न्यूयॉर्क टाइम्सने आपल्या ऑफीशियल ट्विटर अकाऊंटवरुन इंद्रा नुयी यांचे हे स्टेटमेंट शेअर केले आहे.

    त्यांच्या या विधानानंतर मात्र त्यांना ट्विटरवर ट्रोल केलं जात आहे. त्यांचे हे विधान बऱ्याच वर्किंग वूमनना अजिबात पटलेलं नाहीये. त्याच मुलाखतीमध्ये त्यांनी असे देखील म्हटले होते की, मी मागील 30 वर्ष एकाच घरामध्ये राहते. त्यांच्या ह्या विधानाला देखील बऱ्याच लोकांनी ट्रोल केले आहे. ट्रोलिंग करताना असे म्हटले आहे की, 30 वर्षांपासून तुम्ही एकाच घरामध्ये राहतात आणि आजुबाजुच्या प्रॉपर्टी विकत घेता कारण आजूबाजूला कुणी तुमच्यापेक्षा मोठं घर बांधू नये यासाठी.


    जगातील सर्वांत प्रभावी CEO इंद्रा नूयी यांनाही अमेरिकेत साडीमुळे जाता येत नव्हते मीटिंगला…


    प्रसिध्द पत्रकार सुचेता दलाल यांनी देखील नुयी यांच्या या स्टेटमेंटला असंवेदनशील म्हटले आहे. त्या म्हणतात की, इंद्रा।नुयी यांच्याकडून असे विधान येणे हे अतिशय निंदनीय आणि धक्कादायक आहे. कामाचे स्वरूप सारखे असूनही आपल्यापैकी बहुतेक स्त्रियांना आजही पुरुषापेक्षा कमी मोबदला दिला जातो.

    सोबत त्यांनी असेही म्हटले आहे की, मी जेव्हा एका मोठ्या न्यूज चॅनेल साठी काम करायचे, तेव्हा तिथे स्त्रियांना प्राधान्य दिले जायचे. स्त्रियांना प्राधान्य देण्यामागे कारण स्त्री पुरुष समानता हे नव्हते. तर कमी पैशांमध्ये स्त्रियांकडून जास्तीत जास्त काम करुन घेतले जाते, हे खरे कारण होते.

    इंद्रा नुयी यांनी केलेल्या विधाना मुळे ट्विटरवर त्या मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहेत.

    ‘I never asked rise in salary’ says Indra Nooyi, issue of equal pay has bubbled up again on Twitter, Indra nooyi got trolled

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Trump said : ट्रम्प म्हणाले- आम्ही भारत-पाक अणुयुद्ध रोखले; दोन्ही देशांना समजावले; दोघांनीही सहमती दर्शवली

    व्यापाराचे हत्यार वापरून अमेरिकेनेच भारत – पाकिस्तानचे अणुयुद्ध थांबविले, अन्यथा लाखो लोक मेले असते; मोदींच्या भाषणाआधी डोनाल्ड ट्रम्प यांचे निवेदन!!

    Russian President Putin : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची युक्रेनला चर्चेची ऑफर; युरोपीय देशांच्या धमकीनंतर आला प्रस्ताव