विशेष प्रतिनिधी
टोकियो: जपानमधील करोना परिस्थिती हाताळण्यास अपयश आल्याने जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा हे पंतप्रधानपदाचा राजीनामा देणार आहेत. सत्ताधारी पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी आपण यापुढे उमेदवारी जाहीर करणार नसल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.Failing to handle Corona, Japanese Prime Minister Yoshihide Suga will resign
मागील वर्षी शिंजो आबे यांनी प्रकृतीच्या कारणास्तव पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर योशिहिदे सुगा यांची पंतप्रधानपदी निवड करण्यात आली. सुगा यांनी शुक्रवारी, सत्ताधारी लिबरल डेमोक्रेटिक पक्षाच्या नेत्यांना आपण पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार नसल्याचे म्हटले.
येत्या २९ सप्टेंबर रोजी पक्षांतर्गत निवडणुका होणार आहेत. सुगा यांच्या भूमिकेमुळे ते पंतप्रधानपदावरून पायउतार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नवीन नेत्याची निवड होईपर्यंत ते पंतप्रधानपदी कायम असणार आहेत.
करोना महामारीचा संसर्ग वाढत असतानाही टोकियो आॅलिम्पिकचे आयोजन केल्याबद्दल सुगा यांच्यावर टीका करण्यात येत होती. त्यानंतर सुगा यांनी पंतप्रधानपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. जपानमध्ये करोना संसगार्मुळे आणीबाणी लागू केली आहे. करोनाबाधितांची संख्या १५ लाखांहून अधिक आहे.
Failing to handle Corona, Japanese Prime Minister Yoshihide Suga will resign
महत्त्वाच्या बातम्या
- पीएफच्या व्याजावर आता प्राप्तीकर, नोकरदारांना ठेवावी लागणार दोन स्वतंत्र पीएफ खाती
- एकनाथ खडसे यांचा पाय खोलात, जावयाला मनी लॉड्रिंगअंतर्गत गुन्ह्यातील जामीन अर्ज फेटाळला
- आयफोन १२ प्रो स्मार्टफोनसाठी सीबीआय अधिकाºयाने फोडला अनिल देशमुख यांच्याशी संबंधित अहवाल!
- राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या