वृत्तसंस्था
बीजिंग : चीनमधील यिनचुआन शहरातील एका रेस्टॉरंटमध्ये गुरुवारी रात्री उशिरा स्फोट झाला. या अपघातात 31 जणांचा मृत्यू झाला. चिनी वृत्तसंस्था ‘शिन्हुआ’ने दिलेल्या माहितीनुसार, गॅसच्या गळतीमुळे हा स्फोट झाला. 7 जण जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे. सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.Explosion at Chinese restaurant, 31 killed; Accident due to gas leakage; Preparations for the Dragon Boat Festival were underway in the area
अपघातावेळी परिसरात मोठी गर्दी झाली होती. येथे ड्रॅगन बोट फेस्टिव्हलची तयारी सुरू होती. यिनचुआन शहर ही ‘निंगजिया हुई’ नावाच्या स्वायत्त प्रदेशाची राजधानी आहे. येथील लोकसंख्या 68 लाख आहे. यातील 36% लोक मुस्लिम आहेत.
चिनी मीडिया ‘शिन्हुआ’ने अपघातानंतर काही छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. आग विझविल्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दिसत आहेत. अग्निशमन दलाचे जवान जखमींना रुग्णवाहिकेत घेऊन जाताना दिसत आहेत.
स्फोटानंतर आग पसरली
अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, रेस्टॉरंटमध्ये आधी स्फोट झाला. यानंतर आग लागली. आग इतकी भीषण होती की ती वेगाने पसरली. मात्र, अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणण्यात आली.
7 महिन्यांपूर्वीही 15 मजली इमारतीला आग
चीनमधील निवासी भागात किंवा दाट लोकवस्तीच्या परिसरात स्फोट किंवा आग लागण्याची ही पहिलीच वेळ नाही. 25 नोव्हेंबर 2022 रोजी शिनजियांगमधील एका इमारतीच्या 15व्या मजल्यावर आग लागली. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला होता. तर 9 जण जखमी झाले आहेत. वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, ही आग इलेक्ट्रिक सॉकेटच्या बिघाडामुळे लागली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, इमारतीमध्ये पुरेशी सुरक्षा व्यवस्था नव्हती.
Explosion at Chinese restaurant, 31 killed; Accident due to gas leakage; Preparations for the Dragon Boat Festival were underway in the area
महत्वाच्या बातम्या
- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या संयुक्त राष्ट्र संघात गिनीज बुकात वर्ल्ड रेकॉर्ड!!
- Manipur Violence : अमित शाह यांनी मणिपूर हिंसाचार संदर्भात बोलावली सर्वपक्षीय बैठक
- पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात ‘UN’ मुख्यालयात आयोजित ‘योग’ सत्राने घडवला जागतिक विक्रम!
- रॅपर हनी सिंगला गोल्डी बराडकडून जीवे मारण्याची धमकी!