विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद : विद्यार्थ्यांच्या शिक्षण हक्कांसाठी लढून आंतरराष्ट्रीय पातळीवर गेलेल्या नोबेलविजेत्या युसूफा मलाला हिला पाकिस्तानातील खासगी शाळांनीच विरोध केला आहे. त्यासाठी चक्क तिच्याविरुध्द डॉक्युमेंटरी तयार केली असून दोन लाख शाळांत ती दाखविली जाणार आहे. या माध्यमातून दोन कोटी विद्यार्थ्यांचे मन मलालाबद्दल कलुषित केले जाणार आहे.Documentary made to oppose Malala in Pakistan, showing two crore students in two lakh schools
पाकिस्तानच्या खासगी शाळांच्या संघटनेने सोमवारी विद्यार्थ्यांच्या शिक्षणहक्कांसाठी लढणारी मलाला युसूफझई हिच्या विरोधातली एक डॉक्युमेंट्री प्रसिद्ध केली आहे.मलालाचे लग्नाबद्दलचे, इस्लाम धर्माबद्दलचे विचार हे पाश्चिमात्य संस्कृतीला खतपाणी घालणारे आहेत, असं या संघटनेचं म्हणणं आहे. त्यामुळे आय अॅम नॉट मलाला हे नाव असलेली डॉक्युमेंट्री या संघटनेने प्रसिद्ध केली आहे. विाशेष म्हणजे मलालाच्या चोवीसाव्या वाढदिवशीच हे केले आहे.
पाकिस्तानातल्या खासगी शाळांच्या संघटनेचे अध्यक्ष काशिफ मिर्झा यांनी गुलबर्ग इथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं की, आय अॅम नॉट मलाला या डॉक्युमेंट्रीच्या माध्यमातून आम्ही पाकिस्तानातल्या दोन लाख शाळांमधून २० दशलक्ष विद्यार्थ्यांना ही डॉक्युमेंट्री दाखवणार आहोत.
मलालाचे लग्न, इस्लाम, पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रचार करणारे वादग्रस्त विचार याबद्दलची माहिती देणार आहोत. आम्हाला मलालाचा पदार्फाश करायचा आहे. ज्यामुळे तरुण मुलं-मुली तिच्या कथित महिला हक्कांसाठीच्या लढ्याच्या कथेला भुलणार नाहीत.
मिर्झा म्हणाले, मलालाने लग्नसंस्कृतीला नाकारुन केवळ एकत्र राहण्याला पाठिंबा दिला आहे. लग्नसंस्थेवर हल्ला करुन परिवार संस्कृतीवरच घाव घातला आहे. इस्लाम धर्मातली कोणतीही व्यक्ती लग्नाशिवाय एकत्र राहण्याचं समर्थन करु शकत नाही. मलालाच्या आय अॅम मलाला या पुस्तकातही अशाच प्रकारे इस्लामविरोधी आणि संस्कृतीहनन करणारं लिखाण केलेलंआहे.
पाकिस्तानातल्या खासगी शाळांमध्ये १२ जुलै हा तिचा वाढदिवस आय अॅमनॉट मलाला डे म्हणून साजरा केला जातो आणि या दिवशी तिच्या विरोधात विद्यार्थ्यांना माहिती दिली जाते. मलालाचा काल वाढदिवस होता. ती २४ वर्षांची झाली आहे. तिला २०१४ साली नोबेल शांतता पुरस्कारही मिळाला होता. वयाच्या १७ व्या वर्षी नोबेल पुरस्कार मिळवलेली मलाला ही सर्वात कमी वयाची नोबेल मिळवणारी व्यक्ती आहे. हे नोबेल पारितोषिक तिला भारताचे बालहक्कांसाठी लढणारे कैलाश सत्यार्थी यांच्यासोबत विभागून मिळालेलं आहे.
Documentary made to oppose Malala in Pakistan, showing two crore students in two lakh schools
महत्त्वाच्या बातम्या
- आसाम गोवंश संरक्षण विधेयकावरून काँग्रेसची त्याच दिवशी पलटी; मंदिरांच्या ५ किलोमीटरपर्यंत गोवधबंदी; आधी केला विरोध नंतर दिला पाठिंबा
- भारताच्या वारंवार कांदा निर्यातबंदीवर जपान, अमेरिकेचा आक्षेप
- माध्यमांनी केले “स्टार”; राजकारणात पडले “गार”…!!
- Cloudburst : ढगफुटी केव्हा आणि का होते, यापासून कसे वाचता येईल? जाणून घ्या- 10 मोठ्या घटना