कोरोना प्रतिबंधक लस न घेणाऱ्या नागरिकांना तुरुंगात पाठवणार असल्याची धमकी फिलीपाइन्सचे राष्ट्रपती रोड्रिगो दुतेर्ते यांनी दिली आहे. आपल्या भाषणात ते म्हणाले, लोकांसमोर आता दोन पर्याय आहेत. एक तर लस घ्या अथवा तुम्हाला मी तुरुंगात पाठवणार. तुम्हाला काय हवंय याची निवड तुम्हीच करायची आहे. लस घ्यायची नसेल तर भारत किंवा अमेरिकेत जा असेही त्यांनी म्हटले आहेCorona vaccinated, be prepared to go to jail if not in India or US, Philippine president warns
विशेष प्रतिनिधी
मनीला : कोरोना प्रतिबंधक लस न घेणाऱ्या नागरिकांना तुरुंगात पाठवणार असल्याची धमकी फिलीपाइन्सचे राष्ट्रपती रोड्रिगो दुतेर्ते यांनी दिली आहे. आपल्या भाषणात ते म्हणाले, लोकांसमोर आता दोन पर्याय आहेत. एक तर लस घ्या अथवा तुम्हाला मी तुरुंगात पाठवणार.
तुम्हाला काय हवंय याची निवड तुम्हीच करायची आहे. लस घ्यायची नसेल तर भारत किंवा अमेरिकेत जा असेही त्यांनी म्हटले आहे.फिलीपाईन्समध्ये डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग वेगाने होत आहे. फिलीपाईन्समध्ये याबाबत अलर्टही जारी करण्यात आला आहे.
फिलीपाईन्समध्ये मार्च महिन्यात कोरोना लसीकरण सुरू करण्यात आले होते. मात्र फारच कमी प्रमाणात नागरीक लस घेत आहेत. कोरोना लस न घेणाऱ्या मुर्खांमुळे चिडलो आहे, असे रोड्रिगो दुतेर्ते यांनी म्हटले आहे.फिलीपाईन्समध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला होता.
त्यावेळी लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांना गोळी मारण्याचे आदेश दुतेर्ते यांनी दिले होते. त्यानंतर लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या काही नागरिकांवर सुरक्षा दलाच्या जवानांनी गोळीबार केल्याची घटना समोर आली होती. कोरोना लशीसाठी दुतेर्ते यांनी अमेरिकेलाही धमकी दिली होती. अमेरिकेने कोरोना लसीचा पुरवठा न केल्यास त्यांच्यासोबतचा लष्करी करार रद्द करणार असल्याचे त्यांनी म्हटले होते.
Corona vaccinated, be prepared to go to jail if not in India or US, Philippine president warns
विशेष प्रतिनिधी
- आर्थिक संकटावर मात करत जेट एअरवेज पुन्हा भरारीच्या तयारीत
- पंजाबमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी शिख उमेदवार शोधण्याच्या नादात दिल्लीतील लसीकरण रखडले, ११ लाख डोस असताना ७६ हजार जणांनाच लस दिल्याचा हरदीप पूरी यांचा आरोप
- कोव्हॅक्सिन फेज ३ च्या क्लिनीकल ट्रायलमध्ये ७७.८ टक्के प्रभावी
- लबाडाघरचे आवतान, जेवल्याशिवाय खरे नाही…!!; राष्ट्रमंचाच्या नेत्यांना मिळाला का अनुभवाचा झटका…!!
- Vaccine boost : महत्वाची बातमी ; सप्टेंबरपासून देशात २ वर्षांवरील मुलांना कोरोनाची लस ; डॉ. रणदीप गुलेरिया यांची माहिती