• Download App
    चीनचे बलाढ्य राष्ट्रपती शी जिनपिंग यांची मजबूरी; "गायब" परराष्ट्र मंत्र्याच्या जागी जुन्याच परराष्ट्र मंत्र्यांना नेमावे लागले परत!!|China's strongman President Jinping; The old foreign minister had to be appointed in place of the "missing" foreign minister!!

    चीनचे बलाढ्य राष्ट्रपती शी जिनपिंग यांची मजबूरी; “गायब” परराष्ट्र मंत्र्याच्या जागी जुन्याच परराष्ट्र मंत्र्यांना नेमावे लागले परत!!

    वृत्तसंस्था

    बीजिंग : संपूर्ण जगातले बलाढ्य राष्ट्रपती चीनचे शी जिनपिंग यांची आंतरराष्ट्रीय जगतात किरकिरी झाली आहे. त्यांची राजकीय मजबूरी समोर आली आहे. कारण आपल्या तिसऱ्या राजवटीत स्वतःहून हटवलेल्या परराष्ट्र मंत्र्यांना त्यांना पुन्हा सेवेत बोलवावे लागले आहे. “गायब” परराष्ट्रमंत्री क्वीन गांग यांच्या जागी वांग यी यांना पुन्हा परराष्ट्रमंत्री पदी नेमावे लागले आहे.China’s strongman President  Jinping; The old foreign minister had to be appointed in place of the “missing” foreign minister!!



    राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी नेमलेले परराष्ट्रमंत्री क्वीन गांग हे गेल्या काही दिवसांपासून अचानक “गायब” झाल्याच्या बातम्या आल्या. त्यांचे एका न्यूज अँकर बरोबरचे अफेअर हा चर्चेचा विषय ठरला. त्यानंतर सुरुवातीला क्वीन गांग हे सार्वजनिक जीवनातून बाजूला झाले आणि नंतर त्यांच्या “गायब” झाल्याच्या बातम्या आल्या. गेले काही दिवस त्यामुळे परराष्ट्र मंत्रालय ठप्प झाले होते. परराष्ट्र मंत्रालयाला कोणी नेतृत्व उरले नाही, अशी भावना सर्वत्र पसरत होती. त्यामुळे शी जिनपिंग यांना आपले जुनेच परराष्ट्रमंत्री वांग यी यांना परराष्ट्र मंत्री म्हणून सेवेत बोलवावे लागले.

     शी जिनपिंग यांची मजबूरी

    क्वीन गांग यांना चीनच्या आक्रमक परराष्ट्र धोरणाचे कर्ते म्हणून जिनपिंग यांनी बढती दिली होती. त्यांना सुरुवातीला अमेरिकेत चीनचे राजदूत म्हणून पाठविले. कोरोना काळात त्यांनी चीनचे विशिष्ट आक्रमक परराष्ट्र धोरण तयार करून राबविले. त्यावेळी ते परराष्ट्रमंत्री नव्हते. पण शी जिनपिंग यांनी त्यांच्यावर विश्वास टाकून त्यांना परराष्ट्र मंत्री केले. पण अवघ्या काही महिन्यांतच शी जिनपिंग यांना आपली निवड चुकल्याचे जाणवले. कारण आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनला क्वीन गांग यांच्या आक्रमक परराष्ट्र धोरणाचा फटका सहन करावा लागला आणि नंतर त्यांच्या न्यूज अँकर बरोबरच्या अफेअरची चर्चा सुरू झाली. आता ते “गायब” झाली म्हणून शी जिनपिंग यांना आपले जुनेच परराष्ट्रमंत्री वांग यी यांना परत सेवेत बोलवावे लागले.

    China’s strongman President Jinping; The old foreign minister had to be appointed in place of the “missing” foreign minister!!

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Former Federal Reserve : माजी फेडरल रिझर्व्ह गव्हर्नरने ट्रम्प यांच्यावर खटला दाखल केला; लिसा कुक यांना 3 दिवसांपूर्वी काढून टाकले

    France Returns King Toera : फ्रान्सने मादागास्करच्या राजाची कवटी परत केली; 128 वर्षांपूर्वी शिरच्छेद करून फ्रेंच सैनिकांनी नेली होती

    America : अमेरिका रशियासोबत व्यापार करू इच्छिते; बंदी उठवण्याचा विचार; रशियन अणुऊर्जा जहाजे खरेदी करण्याची तयारीही