• Download App
    रशिया-युक्रेन युध्दामुळे चीनचा जीडीपी वृध्दीदर ३0 वर्षांत सर्वात कमी|China's GDP growth slows to 30 year low due to Russia-Ukraine war

    रशिया-युक्रेन युध्दामुळे चीनचा जीडीपी वृध्दीदर ३0 वर्षांत सर्वात कमी

    विशेष प्रतिनिधी

    शांघाय : रशिया आणि युक्रेनच्या चीनच्या नियार्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असली देशातील मालमत्ता बाजार कोसळलाय. चीनने जीडीपीची वृद्धी ५.५ टक्के इतकी असेल असा अंदाज व्यक्त केलाय. १९९१ नंतरची ही जीडीपी वृद्धीची सर्वात कमी अपेक्षा आहे.China’s GDP growth slows to 30 year low due to Russia-Ukraine war

    चीनमधून जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात होणाºया निर्यातीमध्ये १६.३ टक्क्यांनी वाढ झालीय. रशिया आणि जगभरातील देशांमधून होणाºया वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर चीनमधून इतर देशांना विशेषत: रशियाला होणाऱ्या निर्यातीत वाढ झाली आहे. चीन आणि युक्रेनमधील तणाव नोव्हेंबरपासून वाढू लागला आणि त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा चीनला झालाय.



    युक्रेन आणि रशियामधील युद्ध २४ फेब्रुवारीपासून सुरु झालं असलं तरी यासंदर्भातील परिणाम लक्षात घेत रशियाने इतर देशांवरील आपली निर्भरता कमी करत चीनचा आधार घेतल्याने चीनला मोठा फायदा झालाय.चीनमधील निर्यात वाढीचा वेग हा अपेक्षेपेक्षाही अधिक आहे.

    मागील वर्षीच्या तुलनेत यंदाचा नियार्तीचा दर वाढून १५.७ टक्क्यांपर्यंत असेल असं म्हटलं जातं होतं. मात्र मागील वर्षीच्या जानेवारी-फेब्रुवारीच्या तुलनेत यंदाची चीनमधून रशियात होणारी निर्यात ही ४१ टक्क्यांनी अधिक आहे. या वर्षीच्या पहिल्या दोन महिन्यांमध्ये चीनमधून निर्यात करण्यात आलेल्या मालाची किंमत ५४४.७ बिलियन अमेरिकन डॉलर्स इतकी होती.

    China’s GDP growth slows to 30 year low due to Russia-Ukraine war

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Shahbaz : PAK पंतप्रधानाचा खोटारडेपणा; शाहबाज म्हणाले- भारताकडून आधी युद्धबंदीचे उल्लंघन; रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढणार

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    American Pope : नवीन पोपची घोषणा झाली, रॉबर्ट प्रीव्होस्ट सर्वात मोठे ख्रिश्चन धर्मगुरू, पहिले अमेरिकी पोप