• Download App
    चीनने एकाच दिवसात दिले १ कोटी ८० लाख कोरोना लसीचे डोस, आत्तापर्यंत नागरिकांना दिले १६३.७ कोटी डोस|China gives 18 million doses of corona vaccine in one day, 163.7 crore doses to citizens so far

    चीनने एकाच दिवसात दिले १ कोटी ८० लाख कोरोना लसीचे डोस, आत्तापर्यंत नागरिकांना दिले १६३.७ कोटी डोस

    विशेष प्रतिनिधी

    बीजिंग : संपूर्ण जगात कोरोनाचा हाहाकार सुरू करण्यामागे चीनचे षडयंत्र आहे, असा आरोप होत आहे. मात्र, चीनने कोरोना प्रतिबंधक लसीकरणा मात्र आघाडी घेतली आहे. चीनने ३० जुलै रोजी १ कोटी ८० लाख कोरोना लसीचे डोस वितरित केले. आत्तापर्यंत संपूर्ण चीनमध्ये १६३.७ कोटी लसीचे डोस वितरित केले आहेत.China gives 18 million doses of corona vaccine in one day, 163.7 crore doses to citizens so far

    कोरोनाच्या संक्रमणाला रोखण्यासाठी लसीकरण करण्यासाठी चीनने कठोर निर्णय घेतला आहे. कोरोना लस न घेतलेल्या नागरिकांना रुग्णालयातच उपचार नाकारले जात आहेत. चीनमधील काही राज्यांनी लस सक्तीचा निर्णय जाहीर केला आहे.



    चीनमध्ये गेल्या काही महिन्यांपासून लसीकरणाला वेग देण्यात आला आहे. आतापर्यंत १६३ कोटींहून अधिक डोस देण्यात आल्याचा दावा चीनने केला आहे. उर्वरित लोकसंख्येचे लसीकरण करण्यासाठी चीनने आणखी पावले उचलली आहेत.

    चीनमधील 12 राज्यांतील जवळपास 50 जिल्हा प्रशासनांनी लस न घेणाऱ्या नागरिकांना इशारा दिला होता. लस न घेतल्यास त्या नागरिकांना सार्वजनिक सेवांपासून वंचित ठेवले जाईल, असे आदेशही जारी केले आहेत. प्रशासनाकडून लस घेण्यासाठी या नागरिकांना जुलैअखेरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

    चीनमधील शिचुआन, फुजियान, शानक्सी, जिआंग्सू, जियांग्शी, गुआंग्शी, अनहुई, शेडोंग, हेबॅ, हेनान, झेजियांग आदी राज्यांमध्ये लस सक्तीची घोषणा करण्यात आली आहे. काही राज्यांमध्ये कोरोना प्रतिबंधक लस न घेतलेल्या नागरिकांना सार्वजनिक परिवहन सेवा, सार्वजनिक स्थळी जाता येणार नाही.

    त्याशिवाय, ज्या मुलांच्या पालकांनी लस घेतली नाही, त्यांना शाळेत प्रवेश मनाई करण्यात येणार आहे. चीनने या वर्षाअखेर 80 टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.

    China gives 18 million doses of corona vaccine in one day, 163.7 crore doses to citizens so far

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या