• Download App
    दडपशाही : चीनमध्ये जॅक मा यांची कंपनी अलिबाबाला 2.78 अब्ज डॉलर्सचा दंड, मक्तेदारीचा आरोप । China fines Jack Ma Alibaba $2.78bn for monopolistic practices

    दडपशाही : चीनमध्ये जॅक मा यांची कंपनी अलिबाबाला 2.78 अब्ज डॉलर्सचा दंड, मक्तेदारीचा आरोप

    China fines Jack Ma Alibaba $2.78bn : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे अब्जाधीश जॅक मा यांच्या हात धुवून मागे लागले आहेत. अनेक निर्बंधानंतर चिनी सरकारने आता मक्तेदारीविरोधी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल जॅक मा यांची कंपनी अलिबाबावर मोठी कारवाई केली आहे. बलाढ्य अलिबाबा ग्रुपवर चीनने 2.78 अब्ज डॉलर्सचा दंड ठोठावला आहे. ही आतापर्यंतची अलिबाबाविरुद्धची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. China fines Jack Ma Alibaba $2.78bn for monopolistic practices


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे अब्जाधीश जॅक मा यांच्या हात धुवून मागे लागले आहेत. अनेक निर्बंधानंतर चिनी सरकारने आता मक्तेदारीविरोधी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल जॅक मा यांची कंपनी अलिबाबावर मोठी कारवाई केली आहे. बलाढ्य अलिबाबा ग्रुपवर चीनने 2.78 अब्ज डॉलर्सचा दंड ठोठावला आहे. ही आतापर्यंतची अलिबाबाविरुद्धची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाबा समूहाने मक्तेदारीविरोधी नियमांचे उल्लंघन केल्याचे चिनी नियामकांचे म्हणणे आहे. यासह त्यांनी त्यांच्या बाजारपेठेतील विश्वासार्हतेचा दुरुपयोगही केला आहे. त्यामुळे कंपनीवर 2.78 अब्ज डॉलर्स दंड आकारण्यात आला आहे. या दंडाची रक्कम 2019मध्ये अलिबाबाने मिळवलेल्या उत्पन्नाच्या सुमारे 4 टक्के इतकी आहे. दरम्यान, जॅक मा यांनी गतवर्षी सरकारच्या धोरणांवर टीका केली होती, तेव्हापासून ते चिनी सरकारच्या निशाण्यावर आले आहेत.

    सहा महिने बेपत्ता होते जॅक मा

    ऑक्टोबर 2020 मध्ये जॅक मा यांनी चिनी सरकारवर टीका केली. वृत्तानुसार जॅक मा तेव्हापासून सार्वजनिक कार्यक्रमात दिसू शकले नव्हते. जॅक मा यांच्याबद्दलचे गूढ अधिक वाढले, जेव्हा ते त्यांच्या टॅलेंट शो ‘आफ्रिकेचे बिझनेस हिरो’च्या अंतिम भागामध्येदेखील दिसले नाहीत. या भागामध्ये मा यांच्या जागी अलिबाबाच्या अधिकाऱ्याने हजेरी लावली. त्यानंतर जॅक मा बेपत्ता झाल्याची चर्चा जगभरात होती. त्यानंतर जॅक मा एका व्हिडिओ कार्यक्रमात दिसले होते.

    China fines Jack Ma Alibaba $2.78bn for monopolistic practices

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या

    Goldie Brar : गोल्डी ब्रारने भाजपचे माजी खासदाराकडे मागितला पाच कोटींचा प्रोटेक्शन मनी