• Download App
    पाकिस्तानमध्ये दिवाळखोरीची परिस्थिती, महसूल मंडळाचे अध्यक्ष शब्बर झैदी यांचा इम्रान खान यांना दणका|Bankruptcy situation in Pakistan, Board of Revenue Chairman Shabbir Zaidi hits Imran Khan

    पाकिस्तानमध्ये दिवाळखोरीची परिस्थिती, महसूल मंडळाचे अध्यक्ष शब्बर झैदी यांचा इम्रान खान यांना दणका

    विशेष प्रतिनिधी

    इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये सध्या दिवाळखोरीची परिस्थिती असून देश प्रगती करत असल्याचे दावे करत फसवणूक करण्यापेक्षा दिवाळखोरी मान्य केल्यास उपाय शोधायला मदत होईल, असे परखड मत पाकिस्तानच्या महसूल मंडळाचे अध्यक्ष शब्बर झैदी यांनी व्यक्त केली.Bankruptcy situation in Pakistan, Board of Revenue Chairman Shabbir Zaidi hits Imran Khan

    हॅम्बर्ड युनिव्हर्सिटीमध्ये एका चर्चासत्रात बोलताना त्यांनी पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीविषयी सविस्तर भाष्य केले. ते म्हणाले, मला वाटतं की पाकिस्तानचं दिवाळं निघालं आहे. अडचणीवर उपाय शोधण्यासाठी देशाचं दिवाळं निघाल्याचं मान्य करणं महत्त्वाचं आहे.



    देश प्रगती करतोय हा दावा करून लोकांना फसवण्यापेक्षा आर्थिक संकट मान्य करून त्यावर उपाय शोधणं जास्त चांगलं आहे.१५ डिसेंबरला हे चर्चासत्र झाल्यानंतर त्यांचं वक्तव्य व्हायरल होऊ लागलं. त्यानंतर आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

    मी अर्ध्या तासाचे प्रेझेंटेशन दिलं होतं. पण त्यातला फक्त ३ मिनिटांचा भाग घेतला गेला. हो मी तसं म्हणालो होतो. सध्याची आर्थिक तुटीची परिस्थिती पाहाता आर्थिक संकट दिसून येत आहे. मी जे बोललो, त्याला आधार आहे, असे झैदी यांनी म्हटलं आहे.

    Bankruptcy situation in Pakistan, Board of Revenue Chairman Shabbir Zaidi hits Imran Khan

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या