• Download App
    ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट टीमने रचला इतिहास, सलग 22 वनडे जिंकण्याचा पराक्रम । Australian women's cricket team made history by winning 22 ODIs in a row

    ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट टीमने रचला इतिहास, सलग २२ वनडे जिंकून मोडला पुरुष संघाचा विक्रम

    Australian women’s cricket team : ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाने रविवारी न्यूझीलंडला 6 विकेट्सने पराभूत करून सलग 22 वनडे सामने जिंकण्याचा विक्रम केला आहे. यापूर्वी, रिकी पॉन्टिंगच्या नेतृत्वात त्यांच्याच देशाच्या पुरुष संघाने सलग 21 वनडे सामने जिंकलेले आहेत. असे करून महिला संघाने नवा इतिहास रचला आहे. ऑक्टोबर 2017 पासून ऑस्ट्रेलियन महिला संघाचा एकाही वनडे सामन्यात पराभव झाला नाही. Australian women’s cricket team made history by winning 22 ODIs in a row


    विशेष प्रतिनिधी

    सिडनी : ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाने रविवारी न्यूझीलंडला 6 विकेट्सने पराभूत करून सलग 22 वनडे सामने जिंकण्याचा विक्रम केला आहे. यापूर्वी, रिकी पॉन्टिंगच्या नेतृत्वात त्यांच्याच देशाच्या पुरुष संघाने सलग 21 वनडे सामने जिंकलेले आहेत. असे करून महिला संघाने नवा इतिहास रचला आहे. ऑक्टोबर 2017 पासून ऑस्ट्रेलियन महिला संघाचा एकाही वनडे सामन्यात पराभव झाला नाही.

    ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने 2003 मध्ये केलेल्या त्यांच्याच देशातील पुरुष संघाचा सलग 21 आंतरराष्ट्रीय वनडे जिंकण्याचा विक्रम मोडला आहे.

    ऑस्ट्रेलियाच्या कर्णधार मेग लेनिंगने तीन सामन्यांच्या मालिकेच्या पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी न्यूझीलंडला 212 धावांवर गुंडाळले. सामन्यातील सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करत मेगन शुटेने चार गडी बाद केले.

    ऑस्ट्रेलियाने यानंतर एलिसा हीली (65), एलिस पॅरी (नाबाद 56) आणि एशलेग गार्डनर (नाबाद 53) यांच्या अर्धशतकांच्या बळावर 69 चेंडू शिल्लक असतानाच विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाचा हा महिला संघ सध्याचा विश्वविजेता संघ आहे.

    Australian women’s cricket team made history by winning 22 ODIs in a row

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार