या वर्षाच्या अखेरीस नवीन निवडणुका होईपर्यंत काळजीवाहू सरकारचे नेतृत्व करतील
विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये नॅशनल असेंब्ली बरखास्त केल्यानंतर राजकीय उलथापालथ झाली आहे. दरम्यान, नॅशनल असेंब्लीतील विरोधी पक्षनेते राजा रियाझ यांनी सांगितले की, अन्वर-उल-हक ककर यांची पाकिस्तानचे अंतरिम पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली आहे. शहबाज शरीफ आणि विरोधी पक्षनेते राजा रियाझ यांनी या विषयावर दोनवेळा चर्चेनंतर त्यांचे नाव निश्चित केले आहे. Anwar ul Haq Pakistans Caretaker Prime Minister
बलुचिस्तान अवामी पार्टी (BAP) शी संबंधित सिनेटर अन्वर-उल-हक काकर या वर्षाच्या अखेरीस नवीन निवडणुका होईपर्यंत काळजीवाहू सरकारचे नेतृत्व करतील. पंतप्रधान शरीफ यांनी ९ ऑगस्ट रोजी नॅशनल असेंब्ली विसर्जित करण्याची शिफारस केली होती. अशा स्थितीत घटनेनुसार पुढील सार्वत्रिक निवडणूक ९० दिवसांत होणार आहे.
पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, निवर्तमान पंतप्रधान शहबाज शरीफ आणि नॅशनल असेंब्लीतील विरोधी पक्षनेते राजा रियाझ यांनी अन्वर उल हक काकर यांची काळजीवाहू पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्याबाबत राष्ट्रपती अल्वी यांना निवेदन पाठवले आहे.
Anwar ul Haq Pakistans Caretaker Prime Minister
महत्वाच्या बातम्या
- दिल्ली सेवा विधेयकासह संसदेत मंजूर झालेल्या सर्व चार विधेयकांना राष्ट्रपतींकडून मिळाली मंजुरी!
- ‘’…म्हणून आम्हाला खात्री आहे की, मणिपूरमध्ये शांतीचा सूर्य नक्की उगवेल’’ आशिष शेलारांचं विधान!
- नेपाळचे काँग्रेस खासदार आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या संचालकाची पदवी बनावट, ‘CIB’ने केली अटक
- तुमचा देवावर विश्वास आहे? देवळात कितीदा जाता? माकपाचा देशभरातील कॉम्रेड्सना सवाल