• Download App
    इम्रान खान यांच्या घरात 40 दहशतवादी लपल्याचा आरोप, पंजाब सरकारने म्हटले- 24 तासांत ताब्यात द्या, अन्यथा कारवाई करू|Alleged that 40 terrorists are hiding in Imran Khan's house, Punjab government said - take them into custody within 24 hours, otherwise action will be taken

    इम्रान खान यांच्या घरात 40 दहशतवादी लपल्याचा आरोप, पंजाब सरकारने म्हटले- 24 तासांत ताब्यात द्या, अन्यथा कारवाई करू

    वृत्तसंस्था

    इस्लामाबाद : पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या काळजीवाहू सरकारने बुधवारी सांगितले – लाहोरच्या जमान पार्क भागात इम्रान खान यांच्या घरात 40 दहशतवादी लपले आहेत. 24 तासांच्या आत सुरक्षा दलांच्या ताब्यात न दिल्यास कारवाई केली जाईल. यानंतर रेंजर्सनी खान यांच्या घराला चारही बाजूंनी घेराव घातला.Alleged that 40 terrorists are hiding in Imran Khan’s house, Punjab government said – take them into custody within 24 hours, otherwise action will be taken

    दुसरीकडे, इम्रान यांनी समर्थकांच्या नावाने व्हिडिओ जारी केला. म्हणाले- अटकेच्या बहाण्याने माझ्या हत्येचा कट रचला जात आहे. माझे घर वेढलेले आहे. काही झाले तर त्याला लष्कर जबाबदार असेल.



    18 मार्च रोजी पोलीस खान यांना अटक करण्यासाठी येथे गेले असता त्यांच्यावर अमानुष हल्ला करण्यात आला. पेट्रोल बॉम्बशिवाय गोळीबारही करण्यात आला. 63 पोलीस जखमी झाले होते.

    दरम्यान, इस्लामाबाद उच्च न्यायालयाने एकदा इम्रान यांच्यावर दया दाखवली. बुधवारी त्यांच्या संरक्षणात्मक जामिनाला 31 मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मात्र, नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोने (एनएबी) खान यांना 18 मे रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. खान यांना 9 मे रोजी अल कादिर ट्रस्ट प्रकरणात NAB ने अटक केली होती.

    खान म्हणाले – पुन्हा हिंसाचाराचा धोका

    इम्रान यांनी बुधवारी व्हिडिओ संदेश जारी केला. म्हणाले- एक वर्षापासून परिस्थिती बिकट आहे. आजही ती हाताळली नाही, तर देशाचे अनेक तुकडे होतील. माझा पक्ष निवडणूक सहज जिंकेल, असे सर्वेक्षणात दिसून येत आहे. त्यामुळे सैन्य आणि माझ्या पक्षात भांडण होत आहे. मी पंतप्रधान झालो तर लष्करप्रमुखांना हटवणार नाही. 1971 मध्ये सर्वात मोठ्या पक्षाला संधी न मिळाल्याने देशाची फाळणी झाली. आता पुन्हा हा धोका आहे. माझ्या पक्षाच्या नेत्यांवर पक्ष सोडण्यासाठी दबाव आणला जात आहे.

    Alleged that 40 terrorists are hiding in Imran Khan’s house, Punjab government said – take them into custody within 24 hours, otherwise action will be taken

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या