विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या मुकाबल्यासाठी भारताला जगभरातील ४० हून अधिक देशांकडून मदतीचा ओघ सुरू झाला आहे.All world trying to help india
आयर्लंड, फ्रान्स, बहारीन, कतार, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, गयाना एवढेच नव्हे तर शेजारील बांगलादेश, भूतानसह मॉरिशस, लक्झेम्बर्ग, सिंगापूर, रुमानिया, बहारीन, उझबेकिस्तान, स्वीडन, स्पेन, इटली, डेन्मार्क, मेक्सिको, व्हिएतनाम, जपान आदी देशांनी मदत देऊ केली आहे.
वैद्यकीय ऑक्सिजनची निकड, सिलिंडर टंचाई, रेमडेसिव्हिर इंजेक्शन आणि लस उत्पादन वाढीसोबतच परदेशी लस मिळविण्यासाठीच्या प्रयत्नांचा सर्वोच्च नेतृत्वाच्या पातळीवरून आढावा घेतला जात असून मिळेल तेथून वैद्यकीय साहित्य मिळविण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या सर्व वकिलाती देखील मेहनत घेत आहेत.
अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन, रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्यासह प्रमुख देशांच्या नेत्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा झालेला संवाद आणि मदतीची मिळालेली ग्वाही याचा दाखला देत
परराष्ट्र सचिवांनी चाळीसहून अधिक देशांनी रेमडेसिव्हिर इंजेक्शन, क्रायोजेनिक टॅंकर, कोरोना प्रतिबंधक लस, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर यासाठी भारताला मदतीचा हात देऊ केल्याचे नुकतेच सांगितले.
ब्रिटनमधून वैद्यकीय उपकरणांची पहिली खेप २६ एप्रिलला आली. तर अमेरिका, रशियासह संयुक्त अरब अमिरात या देशांमधून काही मदत दाखल झाली आहे. रशियाने लस निर्मितीसाठी कच्चा माल देण्याचे ग्वाही दिली आहे.
रेमडेसिव्हिरच्या मागणी आणि पुरवठ्यातील तफावत दूर करण्यासाठी गिलिएड या मूळ उत्पादक कंपनीशी संपर्कासोबत इजिप्त आणि इस्राईलशीही संपर्क साधण्यात आला आहे.
All world trying to help india
महत्वाच्या बातम्या
- Gas Cylinder Price : व्यावसायिक गॅस ४५ रूपयांनी स्वस्त ; घरगुती गॅस मात्र महागच
- धक्कादायक : ‘खरं बोललो, तर शीर कापतील’; सीरम प्रमुख अदर पुनावालांना बड्या नेत्यांकडून धमक्या; कोणत्या मुख्यमंत्र्यांकडे बोट?
- Assembly Election Results 2021 : प. बंगालसहित पाचही राज्यांचे निवडणूक निकाल, उद्या सकाळी आठपासून येथे पाहा अचूक रिझल्ट्स
- Tamil nadu Assembly Election 2021 Result : द्रमुक जिंकणार की अद्रमुक ? तमिळनाडूत उत्सुकता शिगेला
- कोरोनामुळे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय डबघाईला ; लॉकडाऊनमुळे अर्थचक्राचे चाक रुतले