विशेष प्रतिनिधी
तेहरान : तालिबानविरोधी अफगाण रेझिस्टन्स फोर्सचा नेता अहमद मसूद हा अफगाणिस्तानातच असून तो शेजारील देशात पळून गेल्याचे वृत्त चुकीचे असल्याचा दावा इराणमधील ‘फार्स’ या वृत्तसंस्थेने केला आहे. मसूद या सुरक्षित ठिकाणी असून पंजशीर खोऱ्यातील इतर सहकाऱ्यांच्या तो संपर्कात आहे, असे या वृत्तसंस्थेच्या अहवालात म्हटले आहे. ahmed Masood is still in Afghanistan
मसूद आणि अफगाणिस्तानचे माजी उपाध्यक्ष अमरुल्लाह सालेह हे ताजिकिस्तानमध्ये पळून गेल्याचा दावा तालिबानच्या प्रवक्त्याने केला होता. पंजशीर खोऱ्याचा ७० टक्के भाग आणि येण्या-जाण्याचा एकमेव मार्ग तालिबानच्या ताब्यात असला तरी खोऱ्यातील काही भागांवर अद्यापही मसूद यांच्या आघाडीची पकड असल्याचेही या अहवालात म्हटले आहे.
दरम्यान तालिबानचे कट्टर विरोधक आणि अफगाणिस्तानचे माजी उपाध्यक्ष अब्दुल रशीद दोस्तम यांची काबूल हवेली तालिबान्यांनी ताब्यात घेतली आहे.
भ्रष्टाचारातून मिळविलेल्या संपत्तीच्या जोरावर दोस्तम यांनी ही हवेली बांधल्याचा तालिबानचा आरोप आहे. प्रचंड मोठा विस्तार असलेल्या या हवेलीमध्ये अनेक अलिशान वस्तू असून एखादा श्रीमंत राजाचा महाल वाटावा, इतकी ही हवेली भव्य आहे. यामध्ये अनेक अत्याधुनिक सोयीसुविधाही आहेत. या हवेलीमध्ये सध्या तालिबानी दहशतवादी फिरत आहेत.
ahmed Masood is still in Afghanistan
महत्त्वाच्या बातम्या
- इन्फोसिससारख्या कंपनीला देशद्रोही म्हणणे चुकीचे, पांचजन्यमधील लेखावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केली नाराजी
- भुकबळीच्या दिशेने जात असलेल्या अफगणिस्थानला अमेरिका, संयुक्त राष्ट्रसंघाकडून मानवतेच्या भावनेतून मदत, अमेरिका देणार ४७१ कोटी
- देशात आठवड्यात एक विश्वविद्यालय सुरु, गेल्या सात वर्षातील चित्र; केंद्र सरकारचे शिक्षणाला प्रोत्साहन दिल्याचा परिणाम
- कोरोना प्रतिबंधक लसीकरणात भारताचा नवा उच्चांक! ७५ कोटींपर्यंत मारली मजल; WHO कडून अभिनंदन