• Download App
    तालिबानी राजवटीचा खरा चेहरा होवू लागला उघड, महिला पत्रकारांना काम करण्यास मज्जाव Women journalist banned for working by Taliban

    तालिबानी राजवटीचा खरा चेहरा होवू लागला उघड, महिला पत्रकारांना काम करण्यास मज्जाव

    विशेष प्रतिनिधी

    काबूल – तू महिला आहेस, घरी जा, असे दटावत तालिबान्यांनी प्रसिद्ध महिला अँकर व पत्रकार शबनम दावरन यांना कार्यालयात येण्यापासून रोखले. रेडिओ टेलिव्हीजन अफगाणिस्तान (आरटीए) या सरकारी वाहिनीसाठी त्या काम करतात.

    शबमन यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या आरटीए पाश्तो न्यूजसाठी काम करतात. व्हिडिओच्यावेळी त्यांनी हिजाब घातला होता. कार्यालयाचे ओळखपत्र दाखवीत त्यांनी सांगितले की, काम सुरु ठेवण्यासाठी मला कार्यालयात जायचे होते, पण मला प्रवेश नाकारण्यात आला. आता राजवट बदलली आहे. त्यामुळे तू काम करू शकत नाहीस असे मला सांगण्यात आले.



    आरटीएच्या आणखी एक महिला पत्रकार खदीजा यांनाही काम करण्यास मनाई करण्यात आले. खदीजा यांनी सांगितले की, मी कार्यालयापाशी गेले, पण मला आत जाऊ देण्यात आले नाही. तालिबानने नेमलेल्या नव्या संचालकांशी मी संपर्क साधला. आमच्या कामाबद्दल लवकरच निर्णय होईल असे तालिबानकडून मला सांगण्यात आले. आता कार्यक्रम बदलण्यात आले आहेत. तालिबान त्यांना हवे असलेल्या कार्यक्रमांचे प्रसारण करतात. एकही महिला सूत्रसंचालक किंवा पत्रकार कामावर नाहीत.

    दरम्यान, जलालाबाद येथे निदर्शनांचे वार्तांकन करणाऱ्या दोन पत्रकारांना तालिबान्यांनी क्रूरपणे मारहाण केली. त्यामुळे ते रडत होते. तेव्हाचा व्हिडिओ बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसचे पत्रकार हफीझुल्लाह मारूफ यांनी पोस्ट केला आहे. मारूफ म्हणतात की, केवळ एका मोर्चाचे वार्तांकन करताना पत्रकारांवर अशी वेळ आल्याचे पाहणे ह्रदयद्रावक आहे. आता अफगाणिस्तानमध्ये पत्रकारांना अशी मारहाण होत असून तालिबानकडून अशी वागणूक दिली जात आहे.

    आणखी एका व्हायरल व्हिडिओनुसार एक तालिबानी एका महिला पत्रकाराला लाथ मारताना आणि तिच्या अंगावर उभा राहात असताना दिसते. त्यावेळी ती महिला वेदनेने कळवळत होती.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Al-Aqsa Mosque : 60 वर्षांत पहिल्यांदाच अल-अक्सा मशीद ईदमध्ये बंद; इराणमध्ये बाजार ओस पडले

    NIA : रशियन इनपुटवरून NIA ने पकडले होते अमेरिकन-युक्रेनियन नागरिक; म्यानमार सीमेवर सशस्त्र गटांना प्रशिक्षण दिले

    Security Breach : अमेरिकेच्या परराष्ट्र-संरक्षण मंत्र्यांच्या घरावर संशयास्पद ड्रोन; सुरक्षेबाबत आपत्कालीन बैठक बोलावली; दोन्ही नेत्यांना हलवण्यावर विचार