• Download App
    भारताला मोठ्या प्रमाणात लशी देण्यासाठी बायडेन प्रशासनावर अमेरिकेत दबाव वाढला|Will USA help India against Corona war?

    भारताला मोठ्या प्रमाणात लशी देण्यासाठी बायडेन प्रशासनावर अमेरिकेत दबाव वाढला

    विशेष प्रतिनिधी

    वॉशिंग्टन : यूएस चेंबर ऑफ कॉमर्स तसेच प्रतिष्ठित भारतीय अमेरिकी व्यक्तींकडून भारताला मदत करण्याबाबत अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यावर दबाव वाढत आहे.Will USA help India against Corona war?

    ॲस्ट्राझेनेका लशीसह कोरोनाप्रतिबंधक अन्य लशी आणि अन्य जीवरक्षक वैद्यकीय साधनांचा पुरवठा भारतात करावा यासाठी अमेरिकेन लॉबीकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत.



    भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या मदतीच्या आवाहनानंतर ‘यूएस चेंबर ऑफ कॉमर्स’ने हे प्रयत्न वाढवले आहेत. कोरोनाविरोधात लढण्यासाठी जयशंकर यांनी जगाची मदत मागितली होती.

    सध्याच्या जागतिक संकटात आमचा पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी आम्ही हरप्रकारे प्रयत्न करीत आहेत. भारत जगाला मदत करत असल्याने जगानेही भारताला सहकार्य केले पाहिजे, अशी अपेक्षा जयशंकर यांनी ट्विटद्वारे केली होती.

    कोरोनाचा मोठा फटका बसलेल्या भारत, ब्राझील व अन्य देशांना अमेरिकेत साठा केलेल्या ॲस्ट्राझेनेका लशीचे लाखो डोस व जीवरक्षक साधनांचा पुरवठा बायडेन प्रशासनाने करावा, यासाठी ‘यूएस चेंबर ऑफ कॉमर्स प्रोत्साहन देत आहे.

    याबाबत संस्थेचे कार्यकारी उपाध्यक्ष मायरॉन ब्रिलियंट म्हणाले. लशींच्या एवढ्या डोसची अमेरिकेला गरज नाही. प्रत्येक अमेरिकी नागरिकाला लस मिळेल, एवढी लस निर्मिती स्थानिक उत्पादक जूनपर्यंत करतील.

    अशावेळी अमेरिकी सरकारने भारतासारख्या गरजवंत देशांना लस दिली तर आपले संबंध मजबूत होतीलच शिवाय कोव्हॅक्स आणि जगभरातील अन्य भागीदारांबरोबर आपण काम करू शकू.

    Will USA help India against Corona war?

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Shahbaz : PAK पंतप्रधानाचा खोटारडेपणा; शाहबाज म्हणाले- भारताकडून आधी युद्धबंदीचे उल्लंघन; रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढणार

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    American Pope : नवीन पोपची घोषणा झाली, रॉबर्ट प्रीव्होस्ट सर्वात मोठे ख्रिश्चन धर्मगुरू, पहिले अमेरिकी पोप