विशेष प्रतिनिधी
ह्युस्टन : अमेरिकेतील टेक्सास राज्यातील एका प्राथमिक शाळेला भारतीय-अमेरिकी नागरिक दिवंगत सोनल भूचर यांचे नाव देण्यात येणार आहे. शिक्षण आणि सामाजिक कार्यात दिलेले योगदान भावी पिढीच्या स्मरणात राहिल, यासाठी भूचर यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला.Who is sonal Bhuchar
सोनल यांचे २०१९ मध्ये वयाच्या ५८ व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले. रिव्हरस्टोन कम्युनिटीमध्ये २०२३ रोजी सोनल भूचर यांच्या नावाने प्राथमिक शाळा सुरू होत आहे. मूळच्या मुंबईच्या असणाऱ्या सोनल या फिजिओथेरिपिस्ट होत्या. त्यांनी मुंबई विद्यापीठात फिजिओथेरेपीत पदवी प्राप्त केली होती. १९८४ मध्ये त्या पती सुबोध भूचर यांच्यासमवेत ह्यूस्टनला आल्या होत्या.
सोनल या एक लोकप्रिय सामाजिक कार्यकर्त्या आणि नेत्या म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांनी नेहमीच स्थानिक आणि भारतीय समुदायाची काळजी घेतली. त्यांनी दोन वर्षे फोर्ट बेंड स्कूल डिस्ट्रिक्ट बोर्ड ऑफ ट्रस्टवर अध्यक्ष म्हणून सहा वर्षे काम केले.
२०१५ रोजी टेक्सासचे गर्व्हनर गेग ॲबोट यांनी त्यांना स्टार नॅशनल सर्व्हिस कमिशन बोर्डमध्ये नेमले होते. हे मंडळ टेक्सासमधील सामाजिक कार्यांना प्रोत्साहित करते आणि अमेरिका कॉर्प्सच्या योजनांवर देखरेख करण्याचे काम करते.
सोनल यांनी नेहमीच आपल्याला सामाजिक कार्यासाठी प्रोत्साहित आणि प्रेरित केले, असे मंडळाचे सदस्य म्हणतात.फोर्ट बेंड इंडिपेंडटन स्कूल डिस्ट्रिक्ट (एफबीआयएसडी) बोर्ड ऑफ ट्रस्टी यांनी ह्यूस्टन येथे नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या प्राथमिक शाळेला सोनल यांचे नाव देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली.