विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स यांची मुलगी जनेफर गेट्स नुकताच विवाहबंधनात अडकली आहे. 16 ऑक्टोबर 2021 रोजी न्यूयॉर्कमध्ये जेमतेम 300 पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये तिने बॉयफ्रेंड नायल नासर सोबत लग्न केले. नायल नासर हा मूळचा इजिप्तचा आहे पण शिक्षण आणि व्यवसायासाठी तो अमेरिकेतच स्थायिक झाला आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा जावई नाएल नासर विषयी सर्वत्र उत्सुकता निर्माण झाली आहे. तर जाणुन घेऊया कोण आहे हा नायल नासर.
Who is Bill Gates’ son-in-law Nael Nasser?
नाएल नासर हा मूळचा इजिप्तचा आहे. पण त्याचा जन्म शिकागो मध्ये झाला होता. त्याला एक भाऊदेखील आहे. आणि त्याच्या भावाचे नाव शराफ नासर असे आहे. नाएलचे बालपण त्याच्या आईवडिलांसोबत कुवैतमधलेच. त्यांच्या पालकांचा आर्किटेक्चरचा बिझनेस आहे. उच्च शिक्षणासाठी 2009 मध्ये तो अमेरिकेमध्ये आला होता. त्यांने स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी मधून आपले शिक्षण पूर्ण केले होते. तर 2013 साली त्याने मॅनेजमेंटने इन इकॉनॉमिक्समधून आपले पदवी शिक्षण पूर्ण केले आहे.
वयाच्या 10व्या वर्षापासून त्याने घोडेस्वारीच्या अनेक स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरूवात केली होती. त्याला ही आवड लहानपणापासूनच आहे. त्याने घोडेस्वारीच्या अनेक स्पर्धा जिंकलेल्या आहेत. नाएल आणि जेनिफर गेट्स यांची लव्ह स्टोरी या खेळाच्या आवडी पासूनच सुरू झाली होती. पॅरिसमध्ये आयोजित केलेल्या एका घोड्यांच्या शर्यतीच्या वेळी 2016 मध्ये ते दोघे एकमेकांना प्रथम भेटले. त्या दोघांनाही घोडेस्वारीची प्रचंड आवड आहे. घोडेस्वारीची ही आवड त्यांना जवळ घेऊन आली.
2020 सालच्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये नाएल इजिप्त देशाकडून घोडेस्वारी या प्रकारामध्ये सहभागी झाला होता. जेनिफर प्रमाणेच तो देखील एका गर्भश्रीमंत घरातून येतो. 2014 मध्ये तिने Nassar Stables LLC नावाची कंपनी स्थापन केली आहे आणि तो एक यशस्वी व्यावसायिक आहे.
Who is Bill Gates’ son-in-law Nael Nasser?
महत्त्वाच्या बातम्या
- शरद पवारांनी भर पावसात घेतलेल्या त्या सभेला आज दोन वर्षे पूर्ण
- राज्यातील चित्रपटगृह चालकांनी योग्य त्या सुरक्षा तपासण्या करूनच चित्रपटगृहे सुरू करावीत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- दिवाळीपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांना थकीत महागाई भत्ता द्या; एसटी कर्मचारी काँग्रेसची मागणी
- आर्यन खानसोबत सेल्फी घेणाऱ्या किरण गोसावीची सहाय्यक शेअर बानो कुरेशी हिला अटक