• Download App
    पाकिस्तानात WhatsApp, Facebook आणि Twitterवर बंदी, हे आहे कारण । WhatsApp, Facebook and Twitter are banned For four hours in Pakistan today

    पाकिस्तानात WhatsApp, Facebook आणि Twitterवर बंदी, हे आहे कारण

    शुक्रवारी पाकिस्तान (Pakistan) सरकारने फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर आणि यूट्यूब यासारख्या मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर (pakistan bans social sites) बंदी घातली. कट्टरपंथी धार्मिक संघटनेने केलेल्या हिंसक निदर्शनांनंतर हा निर्णय घेण्यात आला. हिंसा भडकवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर होऊ शकेल, अशी भीती सरकारला होती. या सर्व प्लॅटफॉर्मवर बंदी केवळ 4 तासांची होती. हिंसाचार पसरवल्याच्या आरोपावरून या संघटनेवर सरकारने बंदीदेखील घातली आहे. WhatsApp, Facebook and Twitter are banned For four hours in Pakistan today


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : शुक्रवारी पाकिस्तान सरकारने फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर आणि यूट्यूब यासारख्या मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली. कट्टरपंथी धार्मिक संघटनेने केलेल्या हिंसक निदर्शनांनंतर हा निर्णय घेण्यात आला. हिंसा भडकवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर होऊ शकेल, अशी भीती सरकारला होती. या सर्व प्लॅटफॉर्मवर बंदी केवळ 4 तासांची होती. हिंसाचार पसरवल्याच्या आरोपावरून या संघटनेवर सरकारने बंदीदेखील घातली आहे.

    असे आहे प्रकरण…

    वास्तविक, तहरीक-ए-लबक पाकिस्तान (टीएलपी) नावाच्या एका संघटनेवर हिंसा पसरवल्याचा आरोप आहे. गेल्या वर्षी प्रसिद्ध झालेल्या वादग्रस्त कार्टूनमुळे फ्रान्समधील राजदूताला तेथून हटवण्यासाठी सरकारवर दबाव आणण्याची या संघटनेची इच्छा होती. टीएलपीने त्यांचे प्रमुख साद हुसेन रिझवी यांच्या अटकेनंतर सोमवारी देशव्यापी निषेध, आंदोलने सुरू केली. गुरुवारी तीन दिवसांच्या हिंसक निदर्शनांनंतर सरकारने या संघटनेवर बंदी घातली.

    सात जण ठार, अनेक जखमी

    टीएलपी समर्थकांची अनेक शहरांमध्ये या आठवड्याच्या सुरुवातीस पोलिसांशी हिंसक चकमक उडाली. यात सात जण मृत्युमुखी पडले आणि 300 पोलीस जखमी झाले. शुक्रवारी नमाजेनंतर निदर्शने रोखण्यासाठी अंतर्गत कामकाज मंत्रालयाने पाकिस्तान दूरसंचार प्राधिकरणाला (पीटीए) सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत सोशल मीडिया सेवा चार तास बंद ठेवण्याचे निर्देश दिले होते. सोशल मीडियावर बंदी आणण्याचे कारण पीटीएने दिले नाही, परंतु अधिकृत सूत्रांनी सांगितले की, हिंसा पसरवण्यासाठी विरोधक सोशल मीडियाचा वापर करू शकतात, अशी भीती व्यक्त केली जात होती.

    WhatsApp, Facebook and Twitter are banned For four hours in Pakistan today

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी ई-बस सेवा अन् रस्ते प्रकल्पाला गती

    Delhi court : दिल्ली कोर्टात आरोपी-वकिलांची न्यायाधीशांना धमकी; म्हणाले- बाहेर भेटा, बघू तुम्ही जिवंत घरी कसे पोहोचता!