• Download App
    आमचे मन केवळ भारतासाठी धडधडते, विहिप प्रमाणेच अमेरिकेतून ‘सेवा’मार्फत मदत |VHP helping from USA to india

    आमचे मन केवळ भारतासाठी धडधडते, विहिप प्रमाणेच अमेरिकेतून ‘सेवा’मार्फत मदत

    विशेष प्रतिनिधी

    वॉशिंग्टन  : अमेरिकेतील विश्व् हिंदू परिषदेने खास चार्टर विमानातून वैद्यकीय मदत भारताकडे रवाना केली आहे. शिकागोहून निघालेल्या विमानात ऑक्सिजन जनरेटर आणि वैद्यकीय उपकरणांचा समावेश आहे.VHP helping from USA to india

    त्यापाठोपाठ येथील भारत-अमेरिकी स्वयंसेवी संस्था सेवा इंटरनॅशनलने भारतातील कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी ८० लाख डॉलरचा निधी जमवला आहे. भारतातील ऑक्सिजनची टंचाई पाहता जगभरातून ऑक्सिजन टँकर, कन्सट्रेटर पाठवण्यात येत आहे.



    सेवा इंटरनॅशनलने देखील अटलांटाहून २१८४ ऑक्सिजन कन्सट्रेटर रवाना केले आहेत. त्याचवेळी सेवा इंटरनॅशनलने सोशल मीडियाच्या माध्यमातून निधी जमविण्याचे लक्ष्य हे पाच दशलक्ष डॉलरवरून दहा दशलक्ष डॉलर केले आहे.

    भारतात कोरोनाची वाढती संख्या पाहता आणि ऑक्सिजनचा तुटवडा पाहता जगभरातून मदतीचा ओघ सुरू आहे.ह्यूस्टन येथील सेवा इंटरनॅशनलने म्हटले की, ऑक्सिजन कन्सट्रेटरची बॅच काल अटलांटाहून दिल्लीकडे रवाना झाली.

    युनायटेड पार्सल सर्व्हिस (यूपीएस) फाउंडेशनने या सामानाची निर्यात मोफतपणे केली आहे. कन्सट्रेटरची बॅच मोफतपणे नेल्याबद्दल सेवा इंटरनॅशनलने यूपीएफ फाउंडेशनचे आभार मानले आहे.

    सामानाची व्यवस्था करणे आणि ते भारतात नेण्यासाठी संपूर्ण सहकार्य केल्याबद्दल संस्था आभारी असल्याचे फेसबुक पोस्टवर म्हटले आहे. भारतातील संस्थेच्या स्वयंसेवकांनी देशभरात कन्सट्रेटर वितरित करण्यासाठी नियोजन केलेले असल्याचेही म्हटले आहे.

    ट्विटरवर म्हटले की, आमचे मन केवळ भारतासाठी धडधडते. भारताला अत्यावश्यलक आरोग्य उपकरणे पाठवण्यासाठी अन्य सहकाऱ्यांबरोबर काम करत आहोत.

    VHP helping from USA to india

    महत्वाच्या  बातम्या

     

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या