विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारत धेर्याने सामना करत आहे. भारताच्या कोरोना परिस्थितीचे जगभरातील माध्यमे अतिशय तिखट वार्तांकन करत आहेत. याच माध्यमांना ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर मॅथ्यू हेडनने कठोर शब्दात सुनावत त्याने जगभरातील माध्यमांना अतुल्य भारताचा सन्मान करा, असा सल्ला दिला आहे. तसेच तुम्ही भारताची जी निंदा करत आहात, त्याने मला रडू येत येत असल्याचे म्हणाला.Veteran Australian batsman Matthew Hayden slammed anti-India media around the world
भारताच्या कठीण काळात, जगभरातून मदतीसाठीचे हात पुढे येत आहेत. भारताशिवाय इतर देशांच्या खेळाडूंनीही मदतीसाठी अनेक पावले पुढे टाकली आहेत. खास करुन ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.
यात मॅथ्यू हेडनचे देखील नाव जोडले गेले आहे. सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी भारत झुंज देत आहे. कोरोनाची लाखोंना लागण होत आहे तर शेकडो लोक जीव गमावत आहेत. अशा परिस्थितीत हेडनने ऑस्ट्रेलियातील नागरिकांना भारताला मद करण्याचे आवाहन केले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारत सध्या सामना करत आहे. याअगोदर भारतात अशी परिस्थिती नव्हती. या कठीण काळात जगभरातील माध्यमे 140 कोटी लोकसंख्या असलेल्या देशाची निंदा करत आहेत, वाट्टेल तसे बोलायला मागेपुढे पाहत नाहीत. पण मला त्यांना सांगायचे, की एवढी मोठी लोकसंख्या असलेल्या देशात एखादी योजना पोहोचवायची हे खूप मोठे आव्हान आहे. आता तर महामारीचा काळ असल्याचे म्हणत हेडनने माध्यमांना खडसावले.
हेडन पुढे बोलताना म्हणाला, मी भारतात मागील एका दशकापासून जात आहे. भारतातील अनेक भागांत फिरलो, खासकरुन तामिळनाडू.ज्या राज्याला मी माझे आध्यात्मिक घर मानतो. एवढ्या विविधतेने नटलेल्या आणि विशाल देशाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांबद्दल माझ्या मनात नेहमीच सर्वोच्च सन्मान राहिला आहे.
मी भारतात जिथेही गेलो, तिथे लोकांनी मला खूप प्रेम दिले, मी त्यासाठी नेहमीच त्यांचा ऋणी राहील. मी मोठ्या अभिमानाने सांगू शकतो की गेल्या काही वर्षात मी भारत अगदी जवळून पाहिला आहे. यावेळी देश केवळ संकटात आहे म्हणून नाही तर माध्यमे सध्या भारताविषयी जे चित्र सांगत आहेत त्याने मला रडू येते. माध्यमांपैकी थोड्याच जणांनी या देशाच्या समस्या समजून घेतल्या असाव्यात किंवा त्यांना माहिती असाव्यात, अशा कठोर शब्दात हेडनने माध्यमांना सुनावले.