• Download App
    वाढत्या कोरोनामुळे भारतात राहू नका, अमेरिकेचे आपल्या नागरिकांना आवाहन USA urged there citizens to leave India

    वाढत्या कोरोनामुळे भारतात राहू नका, अमेरिकेचे आपल्या नागरिकांना आवाहन

    विशेष प्रतिनिधी

    वॉशिंग्टन – अमेरिकी नागरिकांनी लवकरात लवकर देश सोडून बाहेर पडावे, असा सल्ला अमेरिका सरकारने आपल्या नागरिकांना दिला आहे. तसेच, भारतीय दूतावास आणि वकीलातींमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनाही देश सोडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. USA urged there citizens to leave India

    अमेरिकी भारतीयांना माघारी येण्याचे आवाहन केले असले तरी नवी दिल्लीतील दूतावास आणि चेन्नई, हैदराबाद, कोलकता आणि मुंबई येथे असलेल्या वकीलाती सुरुच राहणार असल्याचे अमेरिका सरकारने स्पष्ट केले आहे.



    भारतात रुग्णसंख्या वाढत असल्याने सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधांची कमतरता भासत असल्याने सध्याच्या परिस्थितीत या देशात राहणे आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. प्रवासाच्या दृष्टीने अमेरिकेने भारताचा समावेश ‘श्रेणी ४’ मध्ये केला असून ही सर्वांत धोकादायक परिस्थिती असलेल्या देशांची श्रेणी आहे.

    USA urged there citizens to leave India

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Rahul Gandhi : राहुल गांधींच्या मंचावरून PM मोदींना शिवीगाळ; भाजप नेत्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली

    Raghuram Rajan : रघुराम राजन म्हणाले- रशियन तेल खरेदीबाबत पुन्हा विचार व्हावा; याचा फायदा कोणाला?

    Lovely Anand : खासदार लवली आनंद म्हणाल्या- राहुल गांधींची यात्रा अयशस्वी; जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न