• Download App
    अमेरिकेत ज्येष्ठ नागरिकांना मिळणार कोरोना लशीचा बूस्टर डोस |US will give booster dose for elders

    अमेरिकेत ज्येष्ठ नागरिकांना मिळणार कोरोना लशीचा बूस्टर डोस

    विशेष प्रतिनिधी

    वॉशिंग्टन – अमेरिकेतील ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लशीचा बूस्टर डोस देण्यास येथील रोगनियंत्रक विभागाने मंजुरी दिली आहे. यामुळे अमेरिकेत लवकरच लसीकरणाचा नवा टप्पा सुरु होणार आहे.US will give booster dose for elders

    या अंतर्गत ६५ वर्षांवरील व्यक्ती, नर्सिंग होममध्ये राहणारे आणि संवेदनशील प्रकृती असलेल्या ५० ते ६४ या वयोगटातील नागरिकांना बूस्टर डोस दिला जाणार आहे. फायझर लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर सहा महिन्यांनी हा तिसरा डोस दिला जाणार आहे.



    अमेरिकेत अद्यापही फक्त ५५ टक्के नागरिकांचेच संपूर्ण लसीकरण झाले असल्याने एकही डोस न घेतलेल्यांना लसीकरणासाठी प्रोत्साहन देण्याचा सल्लाही रोगनियंत्रक विभागाने दिला आहे.

    सर्वांचे लसीकरण झाल्याशिवाय काही जणांना बूस्टर डोस देऊनही संसर्ग नियंत्रणात येणार नाही, असे या विभागाने स्पष्ट केले आहे.

    US will give booster dose for elders

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Estonia : एस्टोनियाचे परराष्ट्र मंत्री म्हणाले-:पंतप्रधान मोदी आमच्या देशात आले तर आनंद होईल, भारत आमच्यासाठी महत्त्वाचा भागीदार

    PM Giorgia : मेलोनी हिंदीत म्हणाल्या- परिश्रम हीच यशाची गुरूकिल्ली; मोदी रोम व काशीला इटर्नल सिटी म्हणाले, इटलीच्या पंतप्रधानांना भारतभेटीचे निमंत्रण

    Taiwan : तैवानच्या रस्त्यांवर भारतविरोधी पोस्टर्स लागली; निवडणूक लढवणारा उमेदवार म्हणाला- भारतीय मजुरांना हाकलून द्या