वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : अमेरिकेकडून भारताला कोरोना प्रतिबंधक लशीचे आठ कोटी डोस मिळणार असल्याचे अमेरिकेच्या गृह विभागाने स्पष्ट केले आहे. जून महिन्याच्या अखेरीपर्यंत हे डोस भारताला मिळणार आहेत. एकूण ९२ देशांना अमेरिका लस पुरविणार असून यामुळे जागतिक पातळीवर कोरोनाविरोधातील लढाईला बळ मिळणार आहे. US to supply corona vaccine to 92 countries, India to get 80 million doses
दरम्यान, गरीब देशांना आणि आफ्रिकी संघटनेला फायझर कंपनीच्या लशीचे ५० कोटी डोस देण्याचे अमेरिकेचे नियोजन असून अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन हे लवकरच याबाबत घोषणा करणार असल्याचे ‘व्हाइट हाऊस’तर्फे सांगण्यात आले.
जगभरातील लोकांचे संरक्षण करण्यासाठी अमेरिका कटिबद्ध असून एकाच देशाने सर्वाधिक लशी विकत घेऊन त्या सर्वांना वितरीत करण्याचे हे एकमेव उदाहरण असल्याचे ‘व्हाइट हाऊस’ने सांगितले.
बायडेन हे सध्या जी-७ परिषदेसाठी ब्रिटन दौऱ्यावर आहेत. लस पुरवठ्यासाठी ते इतरही देशांना आवाहन करणार आहेत. अमेरिकेतर्फे ऑगस्टपासून लस वितरणाला सुरुवात होणार आहे.
या वर्षाअखेरीपर्यंत २० कोटी डोस दिल्या जाणार असून पुढील वर्षी ३० कोटी डोस दिले जाणार आहे. हे सर्व डोस संयुक्त राष्ट्रांच्या कोव्हॅक्स या सुविधेमार्फत दिले जाणार आहेत. याशिवाय, अमेरिकेने कोव्हॅक्स सुविधेला दोन अब्ज डोस पुरविले आहेत.
US to supply corona vaccine to 92 countries, India to get 80 million doses
महत्त्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री ठाकरे म्हणतात, आम्ही पारदर्शक! पण कोरोनाचे ११,५०० मृत्यू लपविल्याचे उघड
- बांग्लादेशातून अवैधरीत्या भारतात प्रवेश करणाऱ्या चिनी नागरिकाला BSF ने केली अटक
- क्रेडिट सुईसचा अहवाल : भारतातील निम्म्या लोकसंख्येत कोरोना अँटीबॉडीजची शक्यता, अर्थव्यवस्था लवकरच रुळावर येणार
- Government Guidelines for Children : कोरोना संक्रमित बालकांसाठी नवी गाइडलाइन, रेमडेसिव्हिरचा वापर न करण्याचे निर्देश
- Mumbai Building Collapse : इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाखांची मदत; मुख्यमंत्र्यांनी जखमींची घेतली भेट