• Download App
    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या धोरणामुळे अफगाणिस्तानात तालिबानी दहशतवादी उधळले; डोनाल्ड ट्रम्प यांचा घणाघात US President Joe Biden's policy has led to Florished Taliban militants in Afghanistan; Donald Trump's Aligation

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या धोरणामुळे अफगाणिस्तानात तालिबानी दहशतवादी उधळले; डोनाल्ड ट्रम्प यांचा घणाघात

    वृत्तसंस्था

    वॅशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या धोरणामुळे अफगाणिस्तानमध्ये तालिबानी दहशतवादी उधळले असून त्यांना मोकळे रान मिळाल्याचा घणाघाती आरोप माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानमधून मागे घेताना बायडेन यांनी कोणतीही अट ठेवली नाही, असा आरोप त्यांनी केला. US President Joe Biden’s policy has led to Florished Taliban militants in Afghanistan; Donald Trump’s Aligation

    अफगाणिस्तानातून बाहेर पडण्यासाठी 31 ऑगस्ट ही तारीख निश्चित केली आहे. मी राष्ट्रपती असतो तर वेगळा करार केला असता, असा दावा ट्रम्प यांनी केला. विशेष म्हणजे अमेरिकेनं २०२० मध्ये दोहामध्ये तालिबानसोबत करार केला होता. त्यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हेच होते. त्यानंतर अमेरिकन सैन्यानं मे २०२१ पासून अफगाणिस्तानमधून माघार घेण्यास सुरुवात केली आहे. ट्रम्प यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे की, ‘मी राष्ट्रपती असतो तर आम्ही काही अटींसह अफगाणिस्तानमधून बाहेर पडलो असतो, हे जगाने पाहिले असते. मी स्वत: तालिबानच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली होती. ते जे काही करत आहेत, ते सहन केले जाणार नाही, असा इशारा त्यांना दिला होता.



     

    दुसऱ्या क्रमांकाचं शहर तालिबान्यांच्या ताब्यात अमेरिका आणि नाटोचं लष्कर जोपर्यंत अफगाणिस्तानात होतं तोपर्यंत शांतता होती आणि तालिबानला खूप मोठा पल्ला गाठता आला नाही. पण हे सैन्य निघून गेल्यानंतर तालिबानने प्रचंड दहशत माजवत शुक्रवारी देशातलं दुसरं मोठं शहर कंदाहारवर कब्जा मिळवला, असे वृत्त आहे. आता तालिबान अफगाणिस्तानच्या राजधानी काबुलच्या जवळ पोचलं आहे.

    अफगाणिस्तानातील परिस्थिती भयंकर

    तालिबानने जरांज, शेबरगान, सर-ए-पुल, कुंदुज, तालोकान, ऐबक, फराह, पुल ए खुमारी, बदख्शां, गजनी, हेरात, कंदाहार या १२ राज्यांच्या राजधानीच्या शहरांवर कब्जा केला आहे. वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या दूतावासातील कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी आता थेट सैन्याला पाचारण करण्यात येणार आहे. जवळपास आणखी ३ हजार अमेरिकन सैनिक त्यांच्या सुरक्षेसाठी धाडण्यात येणार आहेत.

    US President Joe Biden’s policy has led to Florished Taliban militants in Afghanistan; Donald Trump’s Aligation

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या