विशेष प्रतिनिधी
ढाका – बांगलादेशमधील अल्पसंख्य हिंदूंवर झालेल्या अत्याचारास चिथावणी देणारी पोस्ट सोशल मिडीयावर टाकलेला मुख्य संशयित आणि त्याच्या साथीदाराने गुन्ह्याची कबुली दिली आहे.Two persons trapped in Bangala Desh
शैकत मंडल हा बांगलादेशी हिंदू मुख्य आरोपी असून रबीउल इस्लाम या मुस्लीम साथीदारासह त्याने जातीय तणाव निर्माण केला.खटल्याआधी झालेल्या सुनावणीत मंडलने कबुली दिल्याचे न्यायालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
१७ ऑक्टोबर रोजी पीरगंज उपविभागातील रंगपूर येथे हिंदूंची घरे पेटविण्यात आली. एका हिंदू व्यक्तीने फेसबुकवर आक्षेपार्ह टाकल्याचे रबीउलनेध्वनिवर्धकावरून जाहीर केले. रबीउल ३६ वर्षांचा असून धर्मगुरू आहे. हिंसाचार आणि लूटमार केल्याचे आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले.
या दोघांना शुक्रवारी अटक करण्यात आली. रंगपूर येथील वरिष्ठ न्याय दंडाधिकाऱ्यांमोसर त्यांनी गुन्हा कबूल केला.या दोघांच्या चिथावणीनंतर सुमारे ७० हिंदूंची घरे जाळण्यात आली. खटलापूर्व सुनावणीत एकूण सात जणांनी गुन्हा मान्य केला.
आतापर्यंत ६८३ जणांना अटक करण्यात आली असून ७० तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. २४ हजार संशयितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून यातील बहुतेक अज्ञात आहेत.
Two persons trapped in Bangala Desh
महत्त्वाच्या बातम्या
- पाटणा मॉडेल मर्डर केस : बिल्डरच्या बायकोने सुपारी देऊन संपवलं, धक्कादायक कारण आल समोर
- महाविकास आघाडीवर देवेंद्र फडणवीसांचा घणाघात , म्हणाले – ‘बायकोनं मारलं तरी केंद्रानं मारलं म्हणून सांगतील’, पैसा फेक तमाशा देख’वाल्या लोकांचं हे सरकार
- क्रूझ ड्रग्ज प्रकरणाचा तपास समीर वानखेडे करणार की नाही?, आरोपांनंतर एनसीबीकडून विभागीय चौकशी, अचानक दिल्लीला बोलावले
- India T20 WC Final : टीम इंडियाला आता चारही सामने जिंकावे लागतील, उपांत्य फेरीत इंग्लंड विरुद्ध होऊ शकतो सामना