• Download App
    Trump U-Turn India-US Relations Most Important ट्रम्प यू टर्न घेणार? म्हणाले- 21व्या शतकासाठी भारताशी संबंध सर्वात महत्त्वाचे

    Trump : ट्रम्प यू टर्न घेणार? म्हणाले- 21व्या शतकासाठी भारताशी संबंध सर्वात महत्त्वाचे

    Trump

    वृत्तसंस्था

    वॉशिंग्टन डीसी : Trump  राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफवरून सुरू तणावाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेकडून एक सकारात्मक संकेत मिळाला आहे. नवी दिल्लीतील अमेरिकी दूतावासाने सोमवारी म्हटले की, भारत-अमेरिका संबंध २१ व्या शतकासाठी सर्वात महत्त्वाचे आहेत. ही भागीदारी सतत नवीन उंची गाठत आहे. या महिन्यात आम्ही लोक, प्रगती आणि आपल्याला पुढे नेणाऱ्या शक्यता पुढे आणत आहोत. या विधानानंतर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो म्हणाले की, दोन्ही देशांच्या लोकांमधील ही चिरस्थायी मैत्री आमच्या सहकार्याचा पाया असून याने पुढे जाण्याची ताकद मिळते, जेणेकरून आम्हाला आर्थिक संबंधांच्या अफाट शक्यतांची जाणीव होऊ शकेल.Trump

    ट्रम्प म्हणाले-भारताशी कमी व्यापार करतो…

    या विधानांनंतर, संध्याकाळी ट्रम्प यांनी सोशल मीडियावर लिहिले की आम्ही भारताशी खूप कमी व्यापार करतो, तर ते आमच्याशी जास्त व्यापार करतात. भारत रशियाकडून त्यांचे तेल आणि लष्करी उत्पादने खरेदी करतो, अमेरिकेकडून खूपच कमी. त्यांनी आता त्यांचे शुल्क कमी करण्याची ऑफर दिली आहे, परंतु आता उशीर होत आहे. अंबानी कुटुंबाने न्यूयॉर्कमध्ये होणारा सांस्कृतिक कार्यक्रम इंडिया वीकेंड पुढे ढकलला आहे. नीता अंबानी कल्चरल सेंटर १२ सप्टेंबरपासून लिंकन सेंटरमध्ये हे आयोजन करणार होते.Trump



    भारताचा प्रतिहल्ला… नावारोंचे शब्द सांगतात, कथा कोण रचतो : सान्याल

    पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य संजीव सान्याल म्हणाले, या विधानावरून अमेरिकेतील बौद्धिक वर्तुळात भारताबद्दलचा पूर्वग्रह दिसून येतो. ही विचारसरणी १९ व्या शतकातील जेम्स मिलसारख्या वसाहतवादी लेखकाचा वारसा आहे. शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की नावारोंनी आपला मुद्दा मांडण्यासाठी भारतातील एका वर्गाचा वापर करणे लज्जास्पद व दुर्दैवी आहे.

    सकारात्मक संकेतांपूर्वी ट्रम्प यांचे व्यापार सल्लागार पीटर नवारो यांचे विधान आले. ते भारताबद्दल थोडे विचित्र बोलले. फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, भारत क्रेमलिनचा धोबीघाट बनला आहे. तेथे ब्राह्मण वर्ग देशातील सामान्य लोकांच्या जिवावर नफा कमावत आहे आणि हे थांबले पाहिजे. नवारो म्हणाले, पंतप्रधान मोदी महान नेते आहेत, परंतु भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही असताना ते पुतीन आणि जिनपिंग यांना कसे सहकार्य करू शकतात हे कळत नाही. नवारो यांनी रशिया-युक्रेन युद्धाचे वर्णन ‘मोदींचे युद्ध’ म्हटले होते.

    Trump U-Turn India-US Relations Most Important

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Bangladesh : न्यूयॉर्कमध्ये बांगलादेशी विद्यार्थी नेत्यावर अंडी फेकली; हसीनांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दहशतवादी म्हटले

    Italy : इटलीमध्ये पॅलेस्टिनी समर्थकांनी तोडफोड-जाळपोळ केली; 60 पोलिस जखमी; पॅलेस्टाईनला मान्यता न दिल्याबद्दल संताप

    संयुक्त राष्ट्रसंघात जणू काही शांततेचा मसीहा अवतरला; पण महत्त्वाच्या मुद्द्यांवर मूग गिळून गप्प बसला!!